Nanded : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी ‘पेरणी पॅटर्न’च बदलला, काय आहे टोकण पध्द?

उत्पादन वाढीसाठी पेरणी प्रक्रिया ही महत्वाची मानली जाते. पेरणी करतानाच योग्य पध्दती राबवली तर उत्पादनात वाढ ही निश्चित मानली जात आहे. आता नियमित पध्दतीने पेरणी करुन एकरी 7 ते 8 क्विंटल सोयाबीनचा उतार येत असत. पण टोकण पध्दतीने पेरणी केल्याने कमी बियाणांमध्ये अधिकचे उत्पादन हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

Nanded : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी 'पेरणी पॅटर्न'च बदलला, काय आहे टोकण पध्द?
नांदेडमध्ये पेरणी पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न केला जात आहेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:40 AM

नांदेड : अर्थकारणाच्या दृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी (Kharif Season) खरीप हंगामाच महत्वाचा आहे. शिवाय यामध्ये (Soybean Crop) सोयाबीन हे मुख्य पीक असून आता उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत पारंपरिक पध्दतीने सोयाबीनचा पेरा केला जात होता. पण उत्पादनवाढीसाठी पेरणी पध्दतीमध्ये बदल होत आहे. शेतकरी आता टोकण पध्दतीने (Sowing) पेरणीवर भऱ देत आहे. अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. त्यांनी टोकण पध्दतीने सोयाबीन पेऱ्याला सुरवात केली आहे. त्यामुळे पेरणी पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

अशी करा टोकण पध्दतीने पेरा

उत्पादन वाढीसाठी पेरणी प्रक्रिया ही महत्वाची मानली जाते. पेरणी करतानाच योग्य पध्दती राबवली तर उत्पादनात वाढ ही निश्चित मानली जात आहे. आता नियमित पध्दतीने पेरणी करुन एकरी 7 ते 8 क्विंटल सोयाबीनचा उतार येत असत. पण टोकण पध्दतीने पेरणी केल्याने कमी बियाणांमध्ये अधिकचे उत्पादन हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. आता काळाच्या ओघात ही पध्दत रुढ होत आहे. टोकण पध्दत म्हणजे ज्या प्रमाणे हळदीची किंवा उसाची सरी काढून लागवड केली जाते तीच पध्दत सोयाबीनसाठी राबवायची आहे. यामध्य़े साडेतीन फुट सरी काढून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेड तयार केले जातात. सरीच्या दोन्ही बाजूस 9 इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केली जाते. याची उगवण क्षमता अधिक असल्याने कमी कालावधीत पीक जोमात येते.

टोकण पध्दतीचे फायदे काय ?

शेतकरी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने आता वेगवेगळे बदल स्वीकारत आहे. आता मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ही पध्दत राबवली जात आहे. शिवाय यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरत आहे. यामुळे बियाणांचा कमी वापर तर होतोच पण सरी पध्दतीने लागवड केल्याने पाणी साचून राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. परिणामी उत्पादनात वाढ होते. गेल्या दोन वर्षापासून टोकण पध्दतीचा अधिकचा वापर होत आहे. यंत्राच्या मदतीने पेरणी तर करता येतेच शिवाय यासाठी एकापेक्षा अधिकच्या मनुष्यबळाची गरज लागत नाही.

हे सुद्धा वाचा

लातुरात यंदा क्षेत्र वाढणार का?

नांदेडप्रमाणेच लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी पेरणी पध्दतीमध्ये बदल करीत आहे. गतवर्षी लातूर जिल्ह्यामध्ये 10 हजार हेक्टरावर टोकण पध्दतीने सोयाबीनचा पेरा झाला होता. शिवाय वर्षभर या पध्दतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले असून काही गावेही दत्तक घेतली आहे. त्यामुळे यंदा टोकण पध्दतीने पेरणीचे क्षेत्र वाढेल असा आशावाद जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांना आहे. मात्र, अपेक्षित पाऊस नसल्याने पेरणीचा वेग मंदावलेला आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.