AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?

पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अजूनही (Farmer) शेतकऱ्यांना महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली असली तरी केंद्राकडील रक्कम विमा कंपन्याकडे जमा झालेली नाही. आता विमा कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली असून रक्कम जमा झाली की ती वितरीत करण्यात येणार आहे.

पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 20, 2021 | 11:47 AM
Share

मुंबई : दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. गावखेड्यात एकच चर्चा आहे ती नुकसानभरपाईची आणि पी.एम.किसान सन्मान योजनेतील रखडलेल्या हप्ताची. (crop insurance ) मात्र, पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अजूनही (Farmer) शेतकऱ्यांना महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली असली तरी केंद्राकडील रक्कम विमा कंपन्याकडे जमा झालेली नाही. आता विमा कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली असून रक्कम जमा झाली की ती वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यात 34 लाख हेक्टरावरील पीकांचे पावसामुळे नुकसान झाले होते तर 20 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पुर्वसूचना, विमा कंपनीकडून पंचनामे ही प्रक्रीयाही पार पडली होती. मात्र, विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे निधी वाटपाला विलंब होत आहे. नुकसानीचा आढावा दाखल होताच राज्य सरकारने 973 कोटींचा पहिला हप्ता जमा केला आहे. तर आता केंद्र सरकारही 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार आहे.

मात्र, राज्य सरकारने विमा हप्ता अदा केल्यानंतर लागलीच विमा कंपनीने केंद्राकडे पैशाची मागणी करणे अपेक्षित होते. परंतू, याला विलंब झाल्याने ही रक्कम दिवाळीचा सण झाल्यावरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यकृषी खात्याच्या पुरवठ्यानंतर आता केंद्र सरकारकडे पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा झाला असला तरी दिवाळीनंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातून 33 लाख 83 हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना

गतमिहन्यात पावसाने खरीपातील पीकांचे मोठे नुकसान झाले होते. मराठवाड्यात तर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने पीकांची काढणीही करता आलेली नाही. नुकासान झाल्यानंतर अवघ्या 72 तासाच्या आतममध्ये शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना ह्या द्यावयाच्या होत्या. त्यानुसार आता विमा कंपन्यांकडे तब्बल 33 लाख 83 हजार पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर या नुकसानीच्या पोटी राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची 973 कोटी रुपये विमा कंपन्यांना देऊ केले आहेत. राज्य सरकारने निधी दिल्यानंतर केंद्राकडे पाठपुरवा करणे आवश्यक होते पण विमा कंपन्यांनी याकडे कानडोळा केला होता. आता राज्य कृषी खात्याने पाठपुरवा केल्याने केंद्राचाही निधी मिळणार असून मदतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे.

पंचमाने झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लागलीच मदत

पंचनाम्यावरून नुकसानभरपाई ही निश्चित करण्य़ात आलेली आहे. केंद्र सरकारकडे सर्व विमा कंपन्यांनी बिले अदा केलेली आहेत. शिवाय रकमेची मागणी केली असून ही रक्कम विलंब न करता देऊ केली जाते. त्यामुळे पंचनामे होऊन ज्या पध्दतीने नुकसान दाखवण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. भरपाईची रक्कम ही निश्चित झालेली आहे. त्यामुळे काही अडचण होणार नसल्याचे कृषी विभागातील विनयकुमार आवटी यांनी सांगितले आहे.

नुकसान भरपाईची प्रक्रिया असते तरी कशी?

1) शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केल्यानंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे करतात. यासंबंधीचा अहवाल विमा कंपनीला पाठविला जातो. 2) पीक नुकसानीची टक्केवारी ही किती झाली आहे त्यावर मदत घोषीत केली जाते. नुकसानीचा निकष हा एका मंडळासाठी सारखाच असतो. त्या क्षेत्रावरील नुकसान किती आहे. त्याअनुशंगाने विमा कंपन्या ह्या राज्य आणि केंद्र सरकारला अनुदानाची मागणी करतात. 3) पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली असून राज्याने निधीही सपूर्त केला आहे. मात्र, केंद्र सरकारडे अद्यापही विमा कंपनीने अनुदानाच्या रकमेती मागणीच केलेली नाही. त्यामुळे निधीच मिळालेला नाही. मागणी केलेल्या पैशाची तर लागलीच पूर्तता झाली तर या निधीचे विवरण करावे लागणार ही भिती विमा कंपन्यांमध्ये आहे. त्यामुळे मागणीच करण्यात आलेली नाही. (Crop insurance company stalled compensation, farmers distressed)

संबंधित बातम्या :

औषधी वनस्पतींची शेती, हजारोंची गुंतवणूक अन् लाखोंची कमाई

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन

हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार

Follow Us
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?