Kharif Season : खरिपात करा ‘या’ औषधी वनस्पतीची लागवड अन् मिळवा उत्पादन खर्चाच्या 7 पटीने उत्पन्न

ज्या शेतकऱ्यांना अश्वगंधाची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी ही सोपी पध्दत आहे. अश्वगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी शेतजमिन आणि चिकणमाती माती ही हलकी लाल माती योग्य मानली जाते. जमिनीचा पोत मूल्य 7.5 ते 8 च्या दरम्यान असावा, तर ते व्यापारी शेतीसाठी चांगले मानले जाते.अश्वगंधा हे खरे तर पाचयेती खरीपाचे पीक आहे.

Kharif Season : खरिपात करा 'या' औषधी वनस्पतीची लागवड अन् मिळवा उत्पादन खर्चाच्या 7 पटीने उत्पन्न
अश्वगंधा वनस्पती
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 6:05 AM

मुंबई : काळाच्या ओघात का होईना ‘विकेल तेच पिकेल’ ही पध्दत शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. शेती व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात असला तरी काळानुरुप (Crop Change) त्यामध्ये बदल महत्वाचा आहे. आपल्या देशात तर (Medicinal Plant) औषधी शेती फार वर्षापासून केली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये वाढ होत आहे. चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भावही मिळत असून, त्यांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (Government) सरकार औषधी वनस्पतींच्या लागवडीलाही प्रोत्साहन देत आहे. यामधील एक असलेले म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधाची खरी ओळख ही नगदी पीक म्हणूनच आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.सरकार राष्ट्रीय प्रजनन अभियानाअंतर्गत औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत.

अशी करा अश्वगंधाची लागवड

ज्या शेतकऱ्यांना अश्वगंधाची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी ही सोपी पध्दत आहे. अश्वगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी शेतजमिन आणि चिकणमाती माती ही हलकी लाल माती योग्य मानली जाते. जमिनीचा पोत मूल्य 7.5 ते 8 च्या दरम्यान असावा, तर ते व्यापारी शेतीसाठी चांगले मानले जाते.अश्वगंधा हे खरे तर पाचयेती खरीपाचे पीक आहे. म्हणजे एकदा लागवड केली की पाच वेळा पीक घेता येते.वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी 20 ते 35 अंश तापमान व वार्षिक 500 ते 750 मिलिमीटर पाऊस असणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या वाढीच्या वेळी जमिनीत कोरडे हवामान व मुबलक ओलावा असणे आवश्यक असते. त्याच्या लागवडीबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स येथे संशोधन व प्रशिक्षण घेण्यात येत आहे.

एकरी 10 हजार खर्च अन् 68 हजार उत्पन्न

लागवडीपासून अगदी शेवटपर्यंत योग्य जोपासणा केली तर अधिकचे उत्पन्न मिळते. चांगल्या काढणीसाठी जमिनीतील ओलावा व कोरडे हवामान असणे गरजेचे आहे. हे पीक सिंचित व अनिर्बंध अशा दोन्ही परिस्थितीत घेता येते. काही संशोधनात असेही समोर आले आहे की, क्षारयुक्त पाण्यात अश्वगंधाची लागवडही करता येते. एक हेक्टरमध्ये अश्वगंधाची लागवड करण्यासाठी एकूण 10 हजार रुपये खर्च येतो. एक एकरातून शेतकऱ्यांना 5 क्विंटल मूळ आणि बियाणं मिळू शकतं, जे शेतकऱ्यांना जवळपास 78 हजार रुपये मिळवून देते. एक एकरात अश्वगंधा लागवड करुन खर्च वजा करीता 68 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो हे मात्र नक्की.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.