Chandrapur : पावसाने पिकांचे नुकसान, उरली-सुरली आशाही धरणातील पाणी घुसल्याने मावळली, आ. वडेट्टीवार थेट बांधावर

चंद्रपूर : राज्यात सध्या (Monsoon rain) पावसाने उघडीप दिली असली तरी शेती पिकांचे नुकसान हे सुरुच आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसात सातत्य राहिले होते. त्यामुळे (Kharif Season) खरीप हातचा जाणार अशीच स्थिती होती. पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामाला वेग आला आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेगळीच […]

Chandrapur : पावसाने पिकांचे नुकसान, उरली-सुरली आशाही धरणातील पाणी घुसल्याने मावळली, आ. वडेट्टीवार थेट बांधावर
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरात झालेल्या पीक नुकासनीची पाहणी केली.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 3:35 PM

चंद्रपूर : राज्यात सध्या (Monsoon rain) पावसाने उघडीप दिली असली तरी शेती पिकांचे नुकसान हे सुरुच आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसात सातत्य राहिले होते. त्यामुळे (Kharif Season) खरीप हातचा जाणार अशीच स्थिती होती. पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामाला वेग आला आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेगळीच स्थिती आहे. (Dam Water) धरणातील पाण्याची आवक वाढल्याने येथील पाणी ब्रह्मपुरीमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीच्या पुराचे पाणी थेट शेतशिवारात घुसले होते. पावसाने उघडीप दिली तरी धरणातील पाणीसाठा होणारे नुकसान हे टळलेले नाही. पावसाच्या उघडीपीनंतर शेतीकामे जोमात होतील असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण उरली-सुरली आशाही मावळली आहे. नदीकाठच्या शिवारात पाणीच-पाणी अशी स्थिती आहे.

सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणार

ब्रह्मपुरी नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर शेत जमिनही खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय त्यांच्या उदरनिर्वाह देखील होणार नाही अशी भीषण स्थिती ओढावली आहे. नुकसानीची दाहकता पाहता आ. विजय वडेट्टीवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले होते. त्यांनी पिकांची तर पाहणी केलीच पण सोमवारी या नुकसानीबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले आहे.

धरण क्षेत्राच मुसळधार पाऊस

राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी, गोसीखुर्द धरण क्षेत्रात 15 आणि 16 ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. परिणामी नदीला पूर येऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत अन् खर्चही वाया गेला आहे. आता पाऊस नाही पडला तरी नुकान हे ठरलेलेच आहे. शेतातील धानपीक, सोयाबीन, तुर व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पंचनामे गरजेचे

नुकसानभरपाईच्या रकमेसाठी पंचनामे हे गरजेचे आहेत. शिवाय राज्यात या प्रक्रियेला सुरवात झाली होती. असे असतानाच आ. वडेट्टीवार यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली. शिवाय शेतकऱ्यांशी संवादही साधला. पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या भागातील पीक नुकसानीचे आणि शेत जमिनीचे पंचनामे झाले तरच शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळणार आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.