AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पशुखाद्याच्या दरात वाढ, दूध दर घटल्याने शेतीचा मुख्य जोडव्यवसाय अडचणीत

शिवाय बाजारपेठेत कोणत्याच शेतीमलाला दर नाही हे कमी म्हणून की काय आता जोडव्यवसाय असलेला दूग्धव्यवसायही अडचणीत आला आहे. ऐन सणात दूधाला मागणी होत असतानाच खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दर कमी करण्यात आले आहेत. यामध्ये गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली असल्याने आता गाईचे दूधाला डेअरीवर 24 रुपये लिटर मिळत आहे.

पशुखाद्याच्या दरात वाढ, दूध दर घटल्याने शेतीचा मुख्य जोडव्यवसाय अडचणीत
दूग्ध व्यवसाय
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:57 AM
Share

लातूर : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. खरीपात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय बाजारपेठेत कोणत्याच शेतीमालाला दर नाही हे कमी म्हणून की काय आता जोडव्यवसाय असलेला (Milk business) दूग्धव्यवसायही अडचणीत आला आहे. ऐन सणात दूधाला मागणी होत असतानाच (cooperative and private milk unions,) खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दर कमी करण्यात आले आहेत. यामध्ये गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली असल्याने आता गाईचे दूधाला डेअरीवर 24 रुपये लिटर मिळत आहे. तर दुसरीकडे गेल्या पाच महिन्यांमध्ये पशूखाद्यांच्या दरात ही दुपटीने वाढ झाली आहे. दूधाचे घटते दर आणि खाद्याचे वाढत असलेल्या दरामुळे शेतीचा मुख्य जोडव्यवसाय देखील अडचणीत आहे. शिवाय स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची होणारी लूट ही वेगळीच.

काळाच्या ओघाच राज्यात शासकीय दूध संघ हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर सहकारी आणि खासगी संघामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे संघ ठरवतीलच दूधाला दर अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ऐन दिवाळी सणात दूधाला मागणी असताना गाईच्या दूधाच्या दरात थेट दोन रुपयांची घट करण्यात आली आहे. यापूर्वी सहकारी आणि खासगी संघाच्या दूध डेअरीवर गाईच्या दराला 25 रुपये लिटर दर होता तर आता 23 रुपये दिला जात आहे. म्हशीचे दर हे जरी स्थिर असले तरी वाढत्या पशुखाद्याच्या दरामुळे दूध व्यवसायच शेतकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे.

दराबाबत शासनाचा निर्णय काय आहे ?

शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान 35 रुपये दर देणे बंधनकारक आहे. पण खासगी आणि सहकारी दूध संघांकडून सरसकट या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. दिवाळीत दुधाला मागणी असते. शिवाय दूधही पुरेशाप्रमाणात पुरवठा होते आहे. पण तरीही दूध संघांकडून दूधदरात जाणीवपूर्वक कपात केली जात आहे. तसेच अनेक दूध संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटतात. पण आता अनेक संस्थांनीही लाभांशालाच थेट कात्री लावली आहे. त्यामुळे सहकारी आणि खासगी संघावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशी स्थिती झाली आहे.

दूधावर प्रक्रिया करुन अधिकच्या दराने विक्री

राज्यात गाईच्या दूधाचे संकलन दिवसाकाठी हे दोन कोटींच्या घरात आहे. यामध्ये 70 लाख लिटर दूधावर प्रक्रिया होते तर 30 लाख लिटर दूधाची पावडर होते तर एक कोटी लिटरची ही पिशवीतून विक्री होते. मात्र, आता गाईच्या दूधावर प्रक्रिया करण्यावर अधिकचा भर राहिलेला आहे. त्यामुळे थेट विकले जाणाऱ्या दूधाचे महत्व या खासगी संघाना राहिलेले नाही. त्यामुळे मनमानी कारभार करीत गाईच्या दूधाच्या दरात घट करण्यात आली आहे.

पशुखाद्याचे असे वाढले दर

दुभत्या जनावरासाठी आवश्यक असलेल्या खाद्य दरात 100 रुपयांनी वाढ होत आहे तर कधी दूधाची वाढ झाली तर ती 1 किंवा 2 रुपयांनी वाढ होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांमध्ये खाद्यच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. कळण्याचे 50 किलोचे पोते हे 600 वरुन 1000 वर गेले आहेत. मक्यापासून बनवलेली कांडी ही 1000 हून 1400 तर सरकी 600 वरुन 1000 वर तर खापरी पेंडीचे दर हे चार महिन्याखाली 2000 वर होते तेच दर आता 2700 वर गेले आहेत. त्यामुळे मेहनत आणि खर्चाचा विचार करता शेतीचा मुख्य जोडव्यवसाय हा अडचणीत आलेला आहे. (Decline in milk prices hampers farming, reduces cow’s milk prices)

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : रासायनिक खताच्या दरात वाढ, शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांचा नादच खुळा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 हजार ट्रॅक्टरची बुकींग

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.