आमदारांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवल्यास 5 लाख रुपये देणार, खराब रस्त्याविरोधात धुळ्यातील शेतकरी आक्रमक

मान्सूनच्या पावसानं दरवर्षी रस्ते खराब होतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघरी जवळील शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन आंदोलन केलं आहे.

आमदारांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवल्यास 5 लाख रुपये देणार, खराब रस्त्याविरोधात धुळ्यातील शेतकरी आक्रमक
धुळे शेतकरी आंदोलन
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 3:58 PM

धुळे: मान्सूनच्या पावसानं दरवर्षी रस्ते खराब होतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी जवळील शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन आंदोलन केलं आहे. तर, खराब झालेल्या रस्त्यावरुन आमदारांनी चालत जाऊन दाखवल्यास शेतकऱ्यांच्यावतीनं 5 लाख रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येत त्या रस्त्यावरील पाण्यात जाऊन आमदार, खासदार सह लोक प्रतिनिधी च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून निषेध नोंदविण्यात आला आहे.

आमदार, खासदारांचा निषेध

शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी ( सोनगीर) नजीक असलेल्या या गावात शेतकऱ्यांच्या शेती कडे जाणाऱ्या वाघाडी – वाघोदे या रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दैना झाली असून नुकत्याच झालेल्या पावसा मुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती कडे जायला शेतकऱ्यांना तारे वरची कसरत करावी लागत असून असंख्य अडचणी चा सामना करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत त्या रस्त्यावरील पाण्यात जाऊन आमदार, खासदार सह लोक प्रतिनिधी च्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून निषेध नोंदविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला

आमदार जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांच्या सह लोक प्रतिनिधी ना वारंवार निवेदने, तक्रारी करून ही दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या संयमा चा बांध फुटल्याने शेतकऱ्यांनी या लोकप्रतिनिधी च्या विरोधात आंदोलन करून लोक प्रतिनिधी चा निषेध व्यक्त केला आहे.

आमदारांनी रस्त्यावरुन जाऊन दाखवल्यास 5 लाख देणार

आमदार जयकुमार रावल यांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवल्यास त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने 5 लाख रुपये देणार असल्याचे आव्हान देखील शेतकऱ्यांनी आमदारांना केले आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर काम न केल्यास आमदार, खासदार यांच्या सह लोक प्रतिनिधीना गावात बंदी घालण्यात येऊन मतदाना वर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी आमदार, खासदारा सह लोक प्रतिनिधीना दिला आहे.

शेतकऱ्यांनी आम्ही जगावे की मरावे

निसर्गाच्या लहरी पणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसा मुळे शेती चे पिके जेमतेम उभी शेतात उभी झाली होती. त्यात शेतीकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने शेतकऱ्यांना जाण्या – येण्या साठी शेत माल व मजूर घेऊन जाण्यासाठी अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या मुळे सहन शिलतेचा अंत झालेल्या शेतकऱ्यांनी आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल आमदार जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांच्या सह सरपंच व लोक प्रतिनिधीना केला आहे.

इतर बातम्या:

कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा उत्साहात, शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा सण साजरा

पावसाने पाणी पातळीत वाढ मात्र, खरिपातील पिकांसह ऊसाचे नुकसान

Dhule Farmers Protest Waghadi road issue declare five lakh rupees for MLA Jaikumar Rawal

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.