AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा इस्कॉनसोबत करार, शेतकऱ्यांचा विकास तसेच संशोधनावर केले जाणार काम

इस्कॉन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करण्यात आला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा इस्कॉनसोबत करार, शेतकऱ्यांचा विकास तसेच संशोधनावर केले जाणार काम
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 12:00 AM
Share

पालघर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शेती संशोधन करण्यासाठी वाव मिळावा म्हणून इस्कॉन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करण्यात आला. या करारा अंतर्गत शेतीविषयी विविध प्रयोग केले जाणार आहेत. तसेच शेतीक्षेत्रात नव्या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यावर या सामंजस्य कराराच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. (Dr Balasaheb Sawant Konkan Agricultural University have agreement with ISKCON development of farmers and research work will be done)

इस्कॉन तसेच विद्यापीठाला चांगला फायदा होणार

वाडा येथील इस्कॉन, गोवर्धन इको व्हिलेज गालतरे येथे एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दोन्ही संस्थांचा वतीने माननीय कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, डॉ. पराग हळदणकर (संचालक कृषि संशोधन), ब्रजहरी दास आणि सनतकुमार दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या कार्यक्रमास पालघरचे खासदार राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थितीत होते. या सामंजस्य करारामुळे पालघर जिल्ह्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ तसेच दापोली इस्कॉनला चांगलाच फायदा होणार आहे.

सामंजस्य करारा अंतर्गत कोणती उद्दीष्टे ?

1) भाताची सेंद्रिय शेती

2) औषधीय वनस्पतींची लागवड

3) सुधारीत जातीच्या बांबूची लागवड व त्यावरील आधारित लघुउद्योग

4) बारमाही सुगंधी चाफ्याची लागवड आणि त्यापासून अत्तर निर्मिती

5) विविध फळे आणि फुलांची शेती

6) बीजबँक

7) जंगलातील औषधी/ रान भाज्या आणि खाण्यायोग्य फळांची लागवड, संरक्षण आणि संवर्धन करणे,

8) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ विकसित केलेल्या फळझाडे आणि फुलझाडे तसेच कपिला वाणाच्या गाईची जोपासना करणे.

9) या सामंजस्य करारातून वरील प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. तसेच या अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांची सर्वांगीण उन्नती करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत.

कोणते उपक्रम राबवले जाणार ?

या सामंजस्य करारांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शेती संशोधनाचा प्रचार प्रसार करणे, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करविणे असे उपक्रम या सामंजस्य करारांतर्गत राबविले जाणार आहेत.

इतर बातम्या :

PM Kisna Yojana: शेतकऱ्यांच्या एका चुकीमुळं 2 हजार रुपये अडकतील, चूक दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरुच

तांदळाच्या निर्यातीत यंदाही भारताचा दबदबा राहणार, दर घसरण्याची शक्यता

(Dr Balasaheb Sawant Konkan Agricultural University have agreement with ISKCON development of farmers and research work will be done)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.