Cotton Crop : ऐ झुकेगा नहीं…हंगामाच्या अंतिम टप्प्यातही पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम, खरेदीला मुतवाढ

Cotton Crop : ऐ झुकेगा नहीं...हंगामाच्या अंतिम टप्प्यातही पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम, खरेदीला मुतवाढ
कापूस पीक

अकोट बाजार समितीमध्ये यंदा सुरवातीपासून चांगला भाव मिळण्यास सुरवात झाली होती. चांगल्या दरामुळे यंदा अकोट बाजार समितीमध्ये आतापर्यंत 4 लाख 53 हजार क्विंटलपर्यंतची उलाढाल झाली आहे. यामध्ये किमान दर हा 7 हजार 250 तर कमाल दर हा 13 हजार 100 रुपयांपर्यंत मिळालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कापसाला 12 हजार 500 असा दर मिळत आहे. सध्या काही शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस आहे त्याला देखील चांगला दर मिळत आहे.

राजेंद्र खराडे

|

May 12, 2022 | 1:49 PM

अकोला : हंगामाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एखाद्या (agricultural goods) शेती मालाचे दर टिकून राहणे हे सहज शक्य नाही. मात्र, यंदा (Cotton Rate) कापसाचे दर टिकलेच नाही तर दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच झालेली आहे. सध्या काही मोजक्या शेतकऱ्यांकडेच साठवणूकीतला कापूस विक्रीला काढला आहे. हंगामाचा शेवट होत असला तरी कापसाच्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही म्हणून जिल्ह्यातील खरेदी केंद्र ही 21 मे पर्यंत तो उरकता घेणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार असून वाढीव मुदतीमुळे कदाचित दरामध्येही वाढ होणार आहे.

सर्वाधिक दर अकोल्यात

कापसाच्या दराने बाजारपेठेचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. यंदाच्या हंगामात एकदाही कापसाचे दर हे घसरले नाहीत. शिवाय त्यामध्ये वाढच होत गेली. सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये तब्बल 12 हजार 880 रुपयेय प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक दर यंदा कापूस उत्पादकांना मिळाला असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आणखीन 10 दिवस ही खरेदी केंद्र ही सरुच ठेवली जाणार आहेत.

स्थानिक कापूस उत्पादनावर यंदा जिनिंग

लिलाव पध्दतीने शेती मालाचा दर ठरविला जातो. अकोट येथील बाजार समितीमध्ये सोमवारी खुल्या पध्दतीने होतात. या दरम्यान व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा होतात आणि ज्याची बोली अधिक त्याला कापूस दिला जातो. अकोट येथे जिनिंग प्रोसिंगचा व्यवसाय आता वाढलेला आहे. यातच कापसाचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी बाजारपेठेत दाखल होऊन जिनिंगसाठी अधिक्यच्या किंमतीने कापूस खरेदी करतात. त्यामुळेच हंगामाच्या अंतिम टप्प्यातही दर हे टिकूनच आहेत.

हे सुद्धा वाचा

कापूस खरेदीला मुदत वाढ

अकोट बाजार समितीमध्ये यंदा सुरवातीपासून चांगला भाव मिळण्यास सुरवात झाली होती. चांगल्या दरामुळे यंदा अकोट बाजार समितीमध्ये आतापर्यंत 4 लाख 53 हजार क्विंटलपर्यंतची उलाढाल झाली आहे. यामध्ये किमान दर हा 7 हजार 250 तर कमाल दर हा 13 हजार 100 रुपयांपर्यंत मिळालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कापसाला 12 हजार 500 असा दर मिळत आहे. सध्या काही शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस आहे त्याला देखील चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांची साठवणूकीमुळेच संपूर्ण हंगामात कापसाचे दर कायम चढेच राहिले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें