AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची नवीन तारीख समोर! आता या दिवशी खात्यात जमा होणार धडाधड पैसा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: कर्जमाफीची तारीख जाहीर होऊन आणि आश्वासन देऊनही अनेक शेतकऱ्यांना अजूनही खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रतिक्षा आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. आता सरकारने नवीन तारीख दिली आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची नवीन तारीख समोर! आता या दिवशी खात्यात जमा होणार धडाधड पैसा
कर्जमाफीची नवीन तारीख समोर! या दिवशी खात्यात जमा होणार पैसा
| Updated on: Aug 07, 2026 | 2:23 PM
Share

शेतकरी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच तांत्रिक अडचणीने मोठा खोडा घातला. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते हवेतच विरले. आता पुढील दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर आणला होता. 4 ऑगस्ट रोजीपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार होती. पण अडथळा आल्याने शनिवारी अथवा रविवारी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

12 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण

पहिल्या टप्प्यात कमी रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर होणार आहे. ज्यांची पहिल्या यादीत नावे आली नाहीत. त्या शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकू नये असे आवाहनही भरणे यांनी केले.

17 लाखांहून अधिक पात्र शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध

आतापर्यंत 17 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीत नाव आल्यावर पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होणार आहे. गरजू आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे. त्यातून 96 हजार करदात्या शेतकऱ्यांना आणि इतर अपात्र अशा जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये छदामही जमा होणार नाही. सध्या तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होईल.

तर खत विक्रेत्यावर कारवाई

अनेक ठिकाणी युरियासोबत विनाअनुदानित खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. ती खरेदीची दुकानदार सक्ती करत आहेत. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने शासन परिपत्रक काढले आहे. असा प्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाईचे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार