AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा ‘आधार’, गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

शेती मुख्य व्यवसयापेक्षा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार आहे तो दुग्ध व्यवसयाचा. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे घटलेली मागणी यामुळे दूधाच्या दरात वाढ झालेली नव्हती. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे महिन्याकाठी वाढत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी हा जोड व्यवसाय टिकून ठेवलेला आहे. त्याचे फळ आता उन्हाळा सुरु झाला की मिळाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बाजारात लोणी व दूध बुकटीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दोन वर्षानंतर का होईना गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा 'आधार', गायीच्या दूधदरात अखेर वाढ?
गायी दुधाच्या दरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झालेली आहे.
| Updated on: Feb 24, 2022 | 10:58 AM
Share

पुणे : शेती मुख्य व्यवसयापेक्षा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार आहे तो (Milk Business) दुग्ध व्यवसयाचा. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे घटलेली मागणी यामुळे (Milk Price) दूधाच्या दरात वाढ झालेली नव्हती. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे महिन्याकाठी वाढत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी हा जोड व्यवसाय टिकून ठेवलेला आहे. त्याचे फळ आता उन्हाळा सुरु झाला की मिळाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बाजारात लोणी व दूध बुकटीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दोन वर्षानंतर का होईना (Cow’s milk) गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गायीच्या दूधाला 30 रुपये दर मिळत असून अणखीन यामध्ये दोन रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दूधाच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेत. पशूखाद्याचे दर हे दर महिन्याला वाढत आहेत तर दूधाचे दर हे दोन वर्षातून. त्यामुळे ही दरी कशी भरुन काढावी हा प्रश्न कायम आहे.

यामुळे वाढले गायीच्या दूधाचे दर

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मिल्क पावडर व बटर यामध्ये तेजी आली आहे. पावडरचे दर हे 180 रुपयांवरुन आता 270 रुपये किलोंपर्यंत पोहचलेले आहेत तर दुसरीकडे लोण्यापासून तयार होणारे बटर हे 240 वरुन 350 रुपेय किलो असे विकले जात आहे. त्यामुले खासगी डेअरीमधील पावडर व लोण्याचे साठे कमी होत आहेत. परिणामी गायीच्या दरात वाढ झाली आहे.

भविष्यात आशादायी चित्र

केवळ राज्यातच नाही तर जागतिक बाजारपेठेतही दुग्धजन्य पदार्थाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे दूध पावडरचे दर हे प्रति किलो 90 रुपयांनी वाढलेले आहेत तर बटरचे दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध हे 28 रुपयांवरुन आता 30 रुपये लिटरवर गेले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अशीच मागणी राहिली तर गायीच्या दूध दरात अणखीन वाढ होणार असल्याचे सोनाई दूध डेअरीचे गणेश शेटे यांनी सांगितले आहे.

पशुखाद्याचे असे वाढले दर

दूधाच्या दरात वाढ झाली तर ती 1 किंवा 2 रुपयांनी वाढ होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांमध्ये खाद्यच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. कळण्याचे 50 किलोचे पोते हे 600 वरुन 1000 वर गेले आहेत. मक्यापासून बनवलेली कांडी ही 1000 हून 1400 तर सरकी 600 वरुन 1000 वर तर खापरी पेंडीचे दर हे चार महिन्याखाली 2000 वर होते तेच दर आता 2700 वर गेले आहेत. त्यामुळे मेहनत आणि खर्चाचा विचार करता शेतीचा मुख्य जोडव्यवसाय हा अडचणीत आलेला आहे.

संबंधित बातम्या :

सरकार शेतकऱ्यांचे की कारखानदारांचे…! ‘त्या’ निर्णयाची नांदेडमध्ये होळी

Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला

Onion Export : निर्यातदारांना आता उन्हाळी हंगामातील कांद्याची प्रतिक्षा, लाल कांद्याचा काय आहे ‘वांदा’ ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.