Kharif Season : खरिपातील या दोन पिकांच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण..!

Kharif Season : खरिपातील या दोन पिकांच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण..!
संग्रहीत छायाचित्र

कितीही नाही म्हणलं तरी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या दरावरच सध्या तरी सर्वकाही अवलंबून आहे. सोयाबीनच्या दरातील चढ-उतार हा कायम चर्चेतला विषय राहिलेला आहे. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली होती तर पुन्हा दोन दिवसांपूर्वी 100 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे पांढऱ्या सोन्याला चांगलीच झळाळी मिळाली असून कापसाच्या दरात वाढ ही कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 01, 2022 | 4:54 PM

पुणे : कितीही नाही म्हणलं तरी (Kharif season) खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या दरावरच सध्या तरी सर्वकाही अवलंबून आहे. (soybean rate) सोयाबीनच्या दरातील चढ-उतार हा कायम चर्चेतला विषय राहिलेला आहे. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली होती तर पुन्हा दोन दिवसांपूर्वी 100 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे (cotton rate) पांढऱ्या सोन्याला चांगलीच झळाळी मिळाली असून कापसाच्या दरात वाढ ही कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ही दोन्हीही पिकांचा माल आता अंतिम टप्प्यात असला तरी या नववर्षापासून साठवणूकीतला बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय दरात चढ-उतार राहिला तरी या दोन्ही शेतीमालाला दर चांगलेच राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

अजूनही निम्मे सोयाबीन थप्पीलाच

ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या शेवटापर्यंत जवळपास 60 ते 70 टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलेले असते. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे. व्यापाऱ्यांच्या मते आतापर्यंत निम्मेही सोयाबीन बाजारात आले नाही. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात करूनही आणि तेलबिया, सोयापेंडवर साठा मर्यादा लावूनही दरात घसरण झाली नाही. गत चार महिन्यात सोयाबीन बाजाराने अनेक वेळा चढ-उतार अनुभवला आहे. पण शेतकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तोट्यात विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आलीच नाही. शेवटी सध्या सोयाबीन 5 हजार 800 ते 6 हजार 200 पर्यंत आहे.

यामुळे वाढतील सोयाबीन-कापसाचे दर

सध्या सोयाबीन आणि कापसाला सरासरीचा दर मिळत असला तरी पुन्हा कोरोनाच्या धोका वाढत आहे. त्यानुसार निर्बंध लादले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास हे निर्बंध आणखी कडक होऊ शकतात. त्यामुळे या काळात व्यापार प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्‌भवल्यास सोयाबीनमध्ये तेजी येण्याची शक्यता कमीच आहे, मात्र सध्या असलेल्या दरात जास्त घसरणही होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केलेलीच फायद्याची राहणार आहे.

कापसाची झळाळी टिकून राहणारच

हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळालेला आहे. चालू हंगामात गेल्या हंगामातील शिल्लक साठा नव्हता, तसेच कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कापडाला मागणी वाढल्याने उद्योगांकडून कापासालाही मागणी वाढली होती. त्यातच उत्पादन कमी होण्याचा अंदाज आणि शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेली टप्प्याटप्प्याने विक्री, यामुळे कापसाचे दर सुधारले. तसेच कापूस आणि कापडाची निर्यात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी कायम आहे. यातच गतआठवड्यात तर विक्रमी दर मिळालेले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर हे स्थिर राहतील पण कापसाच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

PM KISAN : 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी करा आपल्या नावाची तपासणी !

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें