AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा लहरीपणा त्यात सरकारच्या धोरणांचा फटका, शेतकरीही एक पाऊल पुढेच, वाचा सविस्तर

खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असतानाच शेतीमालाची आयात, साठवणूकीवर मर्यादा यामुळे शेतकऱ्यांनीही थेट पीक पध्दतीमध्येच बदल केला आहे. शेतकऱ्यांनी कडधान्याकडे दुर्लक्ष करीत बाजारात भाव असलेल्या तेलबियांच्याच पेऱ्यावर भर दिला आहे.

निसर्गाचा लहरीपणा त्यात सरकारच्या धोरणांचा फटका, शेतकरीही एक पाऊल पुढेच, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 12:59 PM
Share

पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट तर दुसरीकडे सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे शेतीमालाचे घटत असलेले दर यामुळे शेतकरी हा दुहेरी संकटात आहे. खरीप पाठोपाठ (Rabi season) रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असतानाच शेतीमालाची आयात, साठवणूकीवर मर्यादा यामुळे शेतकऱ्यांनीही थेट पीक पध्दतीमध्येच बदल केला आहे. शेतकऱ्यांनी कडधान्याकडे दुर्लक्ष करीत बाजारात भाव असलेल्या ( oilseeds) तेलबियांच्याच पेऱ्यावर भर दिला आहे. रब्बी हंगामात मोहरीचा विक्रमी पेरा झाला असून दरही विक्रमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ हेणार असल्याचा अंदाज केंद्रिय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे काळानुरुप शेतकरी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच पिकपेऱ्याचे नियोजन करीत आहे.

कडधान्यातील तेजी कमी करण्यासाठीच केंद्राचे निर्णय

निसर्गाच्या लहरीरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाच सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे अपेक्षित होते. यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊन देखील या हंगामातील उडीद, मूगाचे दर कायम हमीभावापेक्षा कमीच होते. सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कडधान्याचे दर कमी केले जात असल्याचा आरोप सातत्याने केंद्र सरकारवर होत आहे. हे कमी म्हणून की काय ? देशांतर्गत उत्पादन मोठ्या प्रमाणात असताना होत असलेली आयात आणि पुन्हा देशात धान्य साठवणूकीतील मर्यादा याचा कायम परिणाम दर घटण्यावर झाला आहे.

मोहरीची विक्रमी लागवड

मोहरीला चालू हंगामात विक्रमी दर मिळत आहे. त्यातच कडधान्याचे दर दबावात असल्याने उत्तरेतील शेतकऱ्यांनी मोहरीला पसंती दिली आहे. यंदा मोहरीचा पेरा 22.5 टक्क्यांनी वाढून 88 लाख 54 हजार हेक्टरवर पोहोचला आहे. देशातील खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी मोहरीचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या हंगामात मोहरीचे 101 लाख टन उत्पादन झाले होते. त्यामुळे कडधान्यातून नाही तर तेलबियांच्या उत्पादनातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने शेतीमाल दराबाबत कायम धोरणे बदललेली आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना कायम बसलेला आहे. पण आता थेट पीकपध्दतीच बदल केला जात असून याचा परिणाम काय होतो हे पहावे लागणार आहे.

2 लाख हेक्टरावर उन्हाळी सोयाबीनचा पेरा

उन्हाळी सोयाबीन म्हणले की केवळ, खरीप हंगामातील बियाणांसाठीच त्याचा पेरा असाच काय तो उपयोग होता. मात्र, आता उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला जात आहे. यंदा पोषक वातावरणामुळे उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. उन्हाळी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा यंदा महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास 2 लाख हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर उत्पादन 8 ते 10 लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

PM KISAN : शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे काय होणार ?

Sugarcane Sludge : विनापरवाना ऊसाचे गाळप, 38 साखर कारखान्यांना 38 कोटींचा दंड

पीकविमा तक्रारीचा ओघ कायम, भरपाईची प्रक्रिया कासवगतीने, शेतकऱ्यांच्या अर्जावर तोडगा काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.