Farmer : पशूसंवर्धन योजनेच्या लाभासाठी अर्ज प्रक्रियेत मराठवाड्यातीलच शेतकरी आघाडीवर

आता नव्याने अनुदानावर दूधाळ गाई-म्हशीचे वाटप योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यानच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. केवळ लातूर वगळता पहिल्या 10 मध्ये मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Farmer : पशूसंवर्धन योजनेच्या लाभासाठी अर्ज प्रक्रियेत मराठवाड्यातीलच शेतकरी आघाडीवर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 5:00 PM

औरंगाबाद : दूग्ध व्यवसाय हा शेतीचा मुख्य व्यवसाय आहे. यामध्ये वाढ व्हावी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना एक शाश्वत अर्थार्जनाचा स्त्रोत निर्माण व्हावा यामाध्यमातून (Animal husbandry business,) पशूसंवर्धन विभाग सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवत आहे. आता नव्याने अनुदानावर (Increase in milk production) दूधाळ गाई-म्हशीचे वाटप योजना (benefits of state government) राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यानच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. केवळ लातूर वगळता पहिल्या 10 मध्ये मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. कमी कालावधी आणि अनुदान मिळवण्याची प्रक्रिया ही सोपी असल्याने अर्जांची संख्या ही वाढत आहे.

राज्यातून 37 हजार 32 अर्ज दाखल

गेल्या 5 दिवसांपासून अनुदानावर गाई-म्हशी तसेच पशूसंवर्धन विभागाच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. इच्छूकांनी अर्ज तर मोठ्या प्रमाणात केले आहेत पण प्रत्यक्ष लाभ किती जणांना भेटणार हे पहावे लागणार आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 4 ते 6 डिसेंबर या काळात राज्यातील 34 जिल्ह्यातून 37 हजार 32 इच्छूकांचे अर्ज दाखल झाले आहेत.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

लाभर्थ्यास स्वताचा फोटो, आधारकार्ड, रेशन कार्ड नंबर, सातबारा, 8 अ, अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाण पत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रेही अदा करावी लागणार आहेत.

ही आहे अधिकृत वेबसाईट

https//ah.mahabms.com या पशूसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन केल्यास योजनेची माहिती आणि लाभर्थ्याने भरावयाची माहिती ही समोर असणार आहे. विचारण्यात आलेली माहिती भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज पशूसंवर्धन विभागाकडे द्यावा लागणार आहे.

अनुदान लाभासाठी अटी-नियम

दूध उत्पादन वाढीच्य़ा अनुशंगाने विचार करुन पशूसंवर्धन विभागाने संकरीत गाय, जर्सी, मुऱ्हा तसेच जाफराबादी यांचा समावेश राहणार आहे. तर देशी गाय, गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातीच्या गाई करिता अनुदान दिले जाते. 4 डिसेंबरपासून या योजनेला सुरवात झाली असून 18 डिसेंबरपर्यंत अर्ज हे भरले जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी

अखेर शेतकऱ्यांनी घेतले मनावर : सोयाबीन विक्रीबाबत महत्वाचा निर्णय, काय झाला बाजारपेठेत बदल?

अवकाळीनंतर सावरल्या नाहीत द्राक्षबागा, आता हतबल शेतकरीच करतोय वाळलेल्या द्राक्षघडाची तोडणी

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.