AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton : कापसाचे उत्पादन ‘रामभरोसे’च, अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणेचा नेमका फायदा काय?

कापूस उत्पादनात भारत देश हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असतानाही योग्य त्या सुविधा उत्पादकांना पुरवल्या जात नाहीत. आता उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला तर त्याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण त्यानुसारच बाजारपेठेचा मागणीचा अंदाज बांधता येणार आहे. मात्र, उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने दरातील चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होणार नाही. शेतकऱ्यांना कोणता अंदाजच बांधता येत नसल्याने विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत नाही.

Cotton : कापसाचे उत्पादन 'रामभरोसे'च, अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणेचा नेमका फायदा काय?
कापसाची अचूक उत्पादकता जाहीर झाल्यास विक्री की साठवणूक याचा अंदाज शेततकऱ्यांना बांधता येणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 29, 2022 | 2:02 PM
Share

पुणे :  (Cotton Production) कापूस उत्पादनात भारत देश हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असतानाही योग्य त्या सुविधा उत्पादकांना पुरवल्या जात नाहीत. आता (Estimate of production) उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला तर त्याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण त्यानुसारच बाजारपेठेचा मागणीचा अंदाज बांधता येणार आहे. मात्र, उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने दरातील (Cotton Rate) चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होणार नाही. शेतकऱ्यांना कोणता अंदाजच बांधता येत नसल्याने विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत नाही. यंदा उत्पादन घटूनही त्याची माहिती सर्वच शेतकऱ्यांना होती असे नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात तर काहींनी विक्रमी दरात कापसाची विक्री केली आहे. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या बाबींची तरी पूर्तता होणे गरजेचे आहे.

अंदाज वर्तवणे का आहे महत्वाचे ?

केंद्र सरकारच्या अख्यारित असणाऱ्या समितीकडून कापसाच्या लागवडीवरुन यंदा कापसाचे उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो. त्यानुसार यंदा 362 लाख गाठींचे उत्पादन होईल असे सांगण्यात आले होते. अतिवृष्टीने नुकसान होऊनही सरासरी एवढे उत्पादन होईल असा अंदाज केंद्राने नेमलेल्या समितीनेच व्यक्त केल्याने हंगामाच्या सुरवातीला कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले. त्यामुळे हंगमाच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली त्यांचे दुपटीने नुकसान झाले आहे. कारण आता हंगामाच्या सुरवातीला जो दर होता त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

सुधारित अंदाज व्यक्त न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

उत्पादनाचे क्षेत्र समोर आले की त्यानुसार उत्पादकता ठरवली जाते. शिवाय वेगवेगळ्या टप्प्यावर ही उत्पादकता अवलंबून असते. कापूस काढणीच्या अंतिम टप्प्यात बोंडअळी आणि बोंडसडचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळेही उत्पादनात घट झाली होती. त्यामुळेच दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे. पण ही उत्पादकता केंद्राने स्थापीत केलेल्या कंपनीने जर जाहीर केली असती तर शेतकऱी सावध राहिला असता. अधिकचा दर मिळाला तरच विक्री हे धोरण अजून अधिकच्या काळासाठी अवलंबले असते.

आता केवळ 5 टक्के कापूस शिल्लक, आता व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’

आता कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांकडे केवळ 5 टक्के कापूस शिल्लक राहिला आहे. तर दुसरीकडे फरदडचे उत्पादन घेतले जात आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 7 ते 8 हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केली आणि आता दर 13 हजार 500 वर पोहचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे. हेच जर सक्षम उत्पादकता ठरवण्यात आली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. त्यामुळे केंद्राने नेमलेल्या समितीचा कारभारही संशयाच्या विळख्यात आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी

Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?