AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?

नांदेड : उन्हाळी हंगाम म्हणलं की पारंपरिक ज्वारी, गव्हाची काढणी केली की हंगामाच संपुष्टात असेच दरवर्षी चित्र असते. यंदा मात्र, भर उन्हाळ्यातही शिवार हिरवागार होता तर आता पीक कापणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 41 अंशावर असताना शेती कामे उरकून घेतली जात आहेत. जिल्ह्यात सध्या करडई पिकाच्या काढणीला वेग आलाय, करडईची कापणी करून यंत्राद्वारे पीक काढणीचे काम सुरू आहे. वाढत्या ऊन्हामुळे शेतीकामे उरकून शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 11:30 AM
Share
यंत्राच्या सहाय्याने शेती कामे : मजुरांची टंचाई आणि वेळेची बचत व्हावी म्हणून शेतीकामात यंत्राचा वापर वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीची कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. यामुळे धान्याची नासाडीही होत नाही. शिवाय अधिकचा खर्च टळला जात आहे.

1 / 4
वाढत्या उन्हामध्ये रब्बीची कामे: आतापर्यंत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. पण गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे रब्बीतील कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी पिकांचे उत्पन्न वाढेल असा आशावाद आहे.

2 / 4
करडई उत्पादनात घट : करडईवर जानेवारी महिन्यात चिकटा मावा आणि खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने करडईच्या उत्पन्नात घट आलीय. सध्या करडई पिकाला बाजारात चांगला भाव असल्याने बळीराजा तळपत्या उन्हात करडईची काढणी करतोय.

3 / 4
करडई होते मुख्य पीक : मराठवाड्यातील बहुतांश भागात अगदी 2000 साला पर्यंत उडीद, मुंग, ज्वारी, कापूस, हरभरा आणि करडई हे प्रमुख पिके होती. उन्हाळी हंगामात करडई ने शेत शिवार बहरून गेलेले दिसत असे, मात्र रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीचा पोत बिघडला आणि करडईचे उत्पन्न घटत गेले. त्यामुळे गेल्या 20 वर्षात करडईचे पीक हे दुर्मिळ बनत गेलय. मात्र आता पुन्हा शेतकरी ह्या जुन्या पिकाकडे वळताना दिसतायत.

4 / 4
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.