PM Kisan Scheme : ‘ई-केवायसी’वर शेतकऱ्यांचा भर, किती खर्च अन् काय आहे प्रक्रिया?

राजेंद्र खराडे

|

Updated on: Jul 24, 2022 | 2:13 PM

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा केले जातात. वर्षभरात 2 हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यामध्ये ही रक्कम देऊ केली जाते. योजनेत अनियमितता होत असल्याने केंद्र सरकारने 'ई-केवायसी' करुन घेण्याची अट घातली आहे. ही प्रक्रिया पू्र्ण केली तरच शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे.

PM Kisan Scheme : 'ई-केवायसी'वर शेतकऱ्यांचा भर, किती खर्च अन् काय आहे प्रक्रिया?
पीएम किसान योजना

पुणे : (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा 12 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांनी (e-KYC) ‘ई-केवायसी’ करुन घेतले नाही त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याकरिता आता केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असताना ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सात दिवस शेतकऱ्यांकडे असताना राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना या उर्वरित काळात ही ‘ई-केवायसी’ करुन घ्यावे लागणार आहे. ऑनलाईन शिवाय (Farmer) शेतकऱ्यांना ऑफलाईनमध्ये ही प्रक्रिया सीएससी अर्थात समाईक सुविधा केंद्रात करता येणार आहे. राज्यभर आता पडताळणीचे काम सुरु असून शेतकऱ्यांनी उर्वरित काळात सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

तरच मिळणार योजनेचा 12 वा हप्ता

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा केले जातात. वर्षभरात 2 हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यामध्ये ही रक्कम देऊ केली जाते. योजनेत अनियमितता होत असल्याने केंद्र सरकारने ‘ई-केवायसी’ करुन घेण्याची अट घातली आहे. ही प्रक्रिया पू्र्ण केली तरच शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. आता केवळ 7 दिवसाचा कालावधी उरला असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विशेषत: सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होताना पाहवयास मिळत आहे. केवायसीसाठी केवळ 15 रुपये खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.  यापूर्वी दोन वेळेस मुदतवाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता अधिकची मुदत देली जाणार का? हे पहावे लागणार आहे.

61 लाख 33 हजार शेतकऱ्यांचा सहभाग

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘ई-केवायसी’ प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, तांत्रिक अडचणी अन् शेतकऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे आतापर्यंत 61 लाख 33 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे तर अजून 45 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलेच नाही. आता कालावधी कमी असताना शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शिवाय शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी कृषी आणि महसूल विभाग प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे eKYC करण्याची सोपी पध्दत

आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI