राज्यात दूधाचे दर वाढणार; Amul, मदर डेअरी पाठोपाठ गोकुळचा मोठा निर्णय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 7:25 AM

Gokul Milk | गोकुळच्या या निर्णयानंतर राज्यातील इतर दुग्ध उत्पादक संघही दरवाढ करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दूधासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

राज्यात दूधाचे दर वाढणार; Amul, मदर डेअरी पाठोपाठ गोकुळचा मोठा निर्णय
संग्रहित छायाचित्र.

Follow us on

मुंबई: अमूल डेअरी आणि मदर्स डेअरी पाठोपाठ आता गोकुळनेही दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता दूधाचे दर वाढणे क्रमप्राप्त आहे. गोकुळच्या (Gokul) या निर्णयानंतर राज्यातील इतर दुग्ध उत्पादक संघही दरवाढ करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दूधासाठी जादा पैसे मोजावे लागतील. (Mother Dairy increased price of all milk products by two rupees after Amul and Gokul)

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शनिवारी गोकुळ दूधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतील. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नाही.

गोकुळच्या दूधाचा दर आता किती?

सध्या गायीच्या एक लीटर दुधासाठी 47 रुपये मोजावे लागत आहेत. ही किंमत आता 49 रुपये इतकी होईल. तर म्हशीच्या दूधाची किंमती प्रतिलीटर 58 रुपयांवरुन 60 रुपये इतकी झाली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाकडून राज्यभरात दररोज 12 लाख लीटर दूधाची खरेदी केली जाते.

अमूल पाठोपाठ मदर डेअरीचं दूध महागलं

इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला आहे. हे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एक जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे एक जुलैपासून अमूलचे दूध उत्पादन महागले आहे. अमूलने तब्बल दीड वर्षानंतर दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्या पाठोपाठ आता मदर डेअरीने देखील दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के बसत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढीबरोबरच बँकिंगचे चार्ज देखील वाढले आहेत.

तर बातम्या:

गोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादकांसाठी भेट, हसन मुश्रीफ-सतेज पाटलांचं ‘ठरलंय’!

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

(Mother Dairy increased price of all milk products by two rupees after Amul and Gokul)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI