शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी, मात्र, नियम अटींचे करावे लागणार पालन

शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. कारण दिवसेंदिवस मजूरांची कमतरता आणि बैजोडीने कामाला लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ही सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर !  50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी, मात्र, नियम अटींचे करावे लागणार पालन
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. कारण दिवसेंदिवस मजूरांची कमतरता आणि बैजोडीने कामाला लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ही सुरु करण्यात आली आहे. काळाच्या ओघात जनजागृती होत असल्यानेही शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेत आहे. मात्र, हा लाभ योग्य शेतकऱ्यालाच मिळावा याकरिता सरकारकडूनही काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत. नेमक्या या नियमांचे पालन केल्यास शेतकऱ्यास 50 अनुदानावर ट्रॅक्टरचा लाभ घेता येणार आहे.

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते. गेल्या काही वर्षात ट्रॅक्टर हे सर्वात वापरले जाणारे उपकरण ठरले आहे. निसर्गाचा लहपरीपणा आणि मजुरांअभावी शेती कामे ही वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे शेतीतील सर्व प्रकारची कामे कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरत आहे. मात्र, पैशांअभावी अनेक शेतकरी हे खरेदी करु शकत नाहीत. हीच बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांना निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी या प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आली आहे.

खरेदीनंतर अनुदानाचा लाभ

शेतकऱ्याने योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा लाभ होणार आहे. यातील अनुदानाचा काही हिस्सा राज्य सरकार तर काही केंद्र सरकार अनुदानरुपी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होतो. या शिवाय काही राज्य सरकार ही 20 ते 50 टक्के सबसिडीवरही ट्रॅक्टर उपलब्ध करुन देत आहेत.

कसा घ्यावयाचा लाभ?

प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ही कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. याकिरता अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी केंद्राना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावरच जाऊन अर्ज करावा लागणार आहे. याकरिता आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, 8 अ, बॅंकेचा तपशील म्हणजे पासबूक, पासपोर्ट साईजचे फोटो हे सोबत ठेवावे लागणार आहेत. शिवाय अडचण आल्यास कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे

या योजनेसाठी महत्वाच्या अटी-

गेल्या सात वर्षात शेतकऱ्याने ट्रॅक्टरची खरेदी केलेली नसावी

शेतकऱ्याची स्व-मालकीची जमीन असावी

शेतकऱ्याला केवळ एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल

प्रत्येक घरातील केवळ एकच व्यक्ती या अनुदानासाठी पात्र असेल

योजना केवळ सीमांत शेतकरी आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे. (Good news for farmers: Tractors, agribusiness more accessible on 50% of the schedule)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसमोर हाच पर्याय : खराब सोयाबीनची विक्री अन् चांगल्या मालाची साठवणूक

आंबिया बहरातील फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा धोका, रब्बी हंगामातील पेरण्याही लांबणीवर !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI