शेतकऱ्यांसमोर हाच पर्याय : खराब सोयाबीनची विक्री अन् चांगल्या मालाची साठवणूक

सोयाबीन काढणीला एकरी 5 हजाराचा खर्च आला होता तर आता सोयाबीन 4600 रुपयांनी क्विंटल विकण्याची नामुष्की ओढावली आहे.आता दिवाळी सणामुळे सोयाबीनची आवक साहजिक आहे. दरवर्षी या मोसमात आवक वाढतेच पण यंदाची स्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाने खराब झालेल्य सोयाबीनची विक्री करावी मात्र, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक ही फायद्याचीच राहणार आहे.

शेतकऱ्यांसमोर हाच पर्याय : खराब सोयाबीनची विक्री अन् चांगल्या मालाची साठवणूक
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 11:29 AM

लातूर : दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनची आवक वाढत असली (Soyabean rates) तरी दरात घसरण ही सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. सोयाबीन काढणीला एकरी 5 हजाराचा खर्च आला होता तर आता सोयाबीन 4600 रुपयांनी क्विंटल विकण्याची नामुष्की ओढावली आहे.आता दिवाळी सणामुळे (Arrivals increase,) सोयाबीनची आवक साहजिक आहे. दरवर्षी या मोसमात आवक वाढतेच पण यंदाची स्थिती ही वेगळी आहे.  (Advice from agronomists) त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाने खराब झालेल्य सोयाबीनची विक्री करावी मात्र, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक ही फायद्याचीच राहणार आहे.

सध्या सोयाबीनला सरासरी 4800 चा दर मिळत आहे. पण हा दर स्थिर नाही. शिवाय गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादन कमी असतानाही दर हे कोसळलेले आहेत. याकरिता सरकारचे धोरण आणि मध्यंतरी झालेला पाऊस ही कारणे आहेत. पण दिवाळीनंतर सोयाबीन दराबाबतचे चित्र हे स्पष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांना घाईगडबड न करता चांगल्या प्रतीच्या साठवणूक करणेच आवश्यक असल्याचे मत कृषीतज्ञ व्यक्त करीत आहेत.

दिवाळीनंतर असे काय होणार ?

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही सोयाबीनच्या उत्पादनावर पावसाचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे क्षेत्र वाढले तरी त्या प्रमाणात उत्पादन हे वाढलेले नाही. सध्या सरकारने 12 लाख टन सोयापेंडची आयात केली असल्याचा बोलबाला आहे. त्याचा परिणामही दरावर होत आहे. मात्र, हे सोयापेंडही निकृष्ट दर्जाचे असल्यास सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज लातूरच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सध्याचे दर हे काही कायम राहणारे नसून यामध्ये बदल निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आवक वाढण्याचे कारण

दरवर्षी दिवाळी सण आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर सोयाबीनची आवक ही वाढत असते. लातूरची बाजारपेठ ही सोयाबीनसाठी महत्वाची मागली जात असून सध्या 30 ते 35 हजार पोत्यांची आवक होत आहे. गतवर्षी याच काळात 70 ते 80 हजार पोत्यांची आवक होत असते. मात्र, आता सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती नाजूक असल्याने सोयाबीनची आवक ही वाढलेली आहे. ही काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

साठवणीकपुर्वी काय करावे ?

मळणी झालेल सोयाबीन हे सावलीमध्ये वाळवावे..वाळवताना थराची जाडी ही 5 सेंटीमिटरपेक्षा अधिक असू नये. अन्यथा आर्द्रता वाढून बुरशीचा धोका निर्माण होतो. कडक उन्हामध्ये सोयाबीन वाळवल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार आहे. साठवणुकी दरम्यान मॅाश्चरचे प्रमाण हे 8 ते 10 टक्केच असणे गरजेचे आहे अन्यथा किडीचे प्रमाण वाढण्याचा धोका होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशिराने पेरणी केलेली आहे त्या सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते. (Storage of stained soyabean and good soyabean is the only option: Advice from agriculture experts)

संबंधित बातम्या :

आंबिया बहरातील फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा धोका, रब्बी हंगामातील पेरण्याही लांबणीवर !

खरीपातील पिकांचे दर घसरताच शेतीमाल तारण योजनेला सुरवात, शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....