ह्या गवताला गुलाब फुलांचा सुगंध, शेती केली तर लाखों कमाईची संधी, वाचा सविस्तर

पामारोजा या वनस्पतीबद्दस तुम्ही कधी ऐकले आहे का? गवतासारखी दिसणारी मात्र, गुलाबाच्या फुलांचा सुगंध वास येणाऱ्या या वनस्पतीची आपण 'सुगंधित शेती' करून लाखो रूपयांची कमाई करू शकतो.

ह्या गवताला गुलाब फुलांचा सुगंध, शेती केली तर लाखों कमाईची संधी, वाचा सविस्तर

मुंबई : पामारोजा या वनस्पतीबद्दस तुम्ही कधी ऐकले आहे का? गवतासारखी दिसणारी मात्र, गुलाबाच्या फुलांचा सुगंध वास येणाऱ्या या वनस्पतीची आपण ‘सुगंधित शेती’ करून लाखो रूपयांची कमाई करू शकतो. पामारोजा हे एक गवत आहे ज्याचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी, खाण्यामध्ये गुलाबाचा सुगंध टाकण्यासाठी आणि गुलाब जल तयार करण्यासाठी  केला जातो. या वनस्पतीची एकदा लागवड केली तर ती 6 वर्षे टिकते. म्हणजेच, पुन्हा पुन्हा पेरणी करण्याची गरज पडत नाही. (Good yield can be obtained by cultivating pamarosa)

या वनस्पतीची लागवड करण्यासाठी साधारण 15 ते 17 हजार रुपये खर्च येतो, परंतु त्यापेक्षा जास्त त्यामधून उत्पन्न मिळते. दिवसेंदिवस या वनस्पतीच्या तेलाची मागणी वाढत आहे. त्यामुळे याची किंमतही वाढ आहे. परफ्यूम, औषधी आणि घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या या तेलाची आता मोठी मागणी आहे. सौंदर्यप्रसाधनांमध्ये या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

या वनस्पतीला सुपीक जमिन नसली तरी देखील चांगले उत्पादन मिळते. यामध्ये पामारोजा, जामरोझा आणि लेमनग्रास यासारख्या वनस्पती देखील मोडतात. हि सुगंधी वनस्पती मध्यम क्षार मातीत 9.0 पर्यंत यशस्वीरित्या घेतली जाऊ शकते. या वनस्पतीमधून फक्त तेलच काढले जाऊ शकते असे मुळीच नसून हि वनस्पती जणावरांना चारा म्हणून देखील वापरू शकतो.

एका हेक्टरमध्ये दीड लाखांचे उत्पन्न

या वनस्पतीची विशेषता म्हणजे यावर कीड आणि रोगांचा कमी हल्ला होतो. सध्या आपण बघतो की, शेतकरी राजा त्रस्त आहे. कुठलेही पिक घेतले तरी देखील म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाहीये त्यामध्येही पिक जरी चांगले आले तरी त्या पिकावर वेगवेगळे रोग पडतात यामुळे शेतकऱ्यांसाठी पामारोजा हे पिक उत्तम पर्याय आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळतो. पामारोजाच्या लागवडीतून एका वर्षाला सरासरी दीड लाख रुपये उत्पन्न सहज मिळू शकते.

गुजरातमध्ये पामारोजाची शेती केली जाते

गुजरातमधील वहेलाल गांवमध्ये पामारोजा वनस्पतीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. उत्तर गुजरात (महेसाणा) हे क्षेत्र तांदूळ, गहू, बटाटे आणि कापसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, वन्य प्राणी, खराब माती, जास्त उत्पादन खर्च आणि कामगार समस्या पाहता त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी पामारोजा / जामरोझाची शेती करण्यास सुरूवात केली आणि आज तेथे मोठ्या प्रमाणत पामारोजाची शेती केली जाते.

संबंधित बातम्या : 

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

(Good yield can be obtained by cultivating pamarosa)

Published On - 1:41 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI