AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

. वाऱ्यामुळे पांढऱ्या सोन्याचे नुकसान अन् शेतकऱ्यांचे हाल हे पोलीसांनी पाहवले नाहीत. त्यामुळे किसानच्या मदतीला जवान धावून आले आणि त्यांनी चक्क 2 एकरातील कापूस वेचणी केली. एवढेच नाही तर कापसाच्या सुरक्षित ठिकाणी साठवणूकीसाठाही मदतही केली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हे चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामाचे सोशल मिडियात मोठे कौतुक होत आहे.

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात
निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने रेगुंठा पोलीस ठाण्याच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनीच शेतकऱ्याला कापूस वेचणी करुन दिली
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 8:01 AM
Share

गडचिरोली : सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरकावून घेतला असतानाच मजूंराअभावी गडचिरोली जिल्ह्यात (Cotton picking) कापूस वेचणीही रखडलेली आहे. वाऱ्यामुळे (Cotton Damaged) पांढऱ्या सोन्याचे नुकसान अन् शेतकऱ्यांचे हाल हे (gadchiroli Police) पोलीसांनी पाहवले नाहीत. त्यामुळे किसानच्या मदतीला जवान धावून आले आणि त्यांनी चक्क 2 एकरातील कापूस वेचणी केली. एवढेच नाही तर कापसाच्या सुरक्षित ठिकाणी साठवणूकीसाठाही मदतही केली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हे चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामाचे सोशल मिडियात मोठे कौतुक होत आहे.

यंदा लांबलेल्या पावसामुळे कापूस वेचणी रखडलेली आहे. यातच मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाची देखील तोडणी शेतकरी करु शकत नाही. यामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन हतबल शेतकऱ्याला पोलीसांनी मदतीचा हात दिलेला आहे.

14 पोलीस कर्मचारी अन् 2 एकरातील कापूस वेचणी

शेती व्यवसयात गटाने काम केले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, आजही गावातील शेतकरी एकवटलेले नाहीत पण याचे महत्व रेगुंठा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी यांना कळलेले आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. वाऱ्यामुळे पांढरे सोने अस्ताव्यस्त होत असताना शेतकऱ्याचे हाल पाहवले नाहीत म्हणून रेगुंठा पोलीस ठाण्यातील 14 अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर आले आणि एका दिवसामध्ये त्यांनी 2 एकरामध्ये 3 ते 4 क्विंटल कापसाची वेचणी केली आहे.

कापूस वेचणीला 20 रुपये किलो मजुरी

खरीप हंगामातील कापसाचे पिक आता अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर अखेरीसच कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असते. पण यंदा पाऊस लांबल्याने शेती कामे रखडलेली आहेत. यात कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. प्रति 1 किलो कापूस वेचणीसाठी 20 रुपये मजुरी देऊनही मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उत्पादनावर अधिकचा खर्च करुनही त्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव

पोलीसांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक हे सोशल मिडियावर हे होतच असते. पण शेतकऱ्याला करण्यात आलेल्या मदतीमुळे किसानच्या मदतीला जवान, जय जवान, जय किसान अशा पध्दतीने नेटकरी व्यक्त झाले आहेत. केवळ कापूस वेचणीच नाही तर वेचलेला कापूस पुन्हा पोत्यामध्ये भरुन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्याला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या :

रेशीम उद्योगाचे महत्व, ‘असा’ घ्या योजनेचा लाभ..!

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक हवालदिल; रब्बी पिकांवरही बुरशीजन्य आजार

ऊस गाळप हंगाम मध्यावर, ऊसतोड कामगारांचा विकास मात्र कागदावरच

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....