Latur : ऊन – पावसाच्या खेळात हंगामी पिकेही धोक्यात, कलिंगडच्या उत्पादनात घट

निसर्गाच्या लहरीपणापुढे सर्वकाही व्यर्थ आहे. खरिपासह रबी हंगामात देखील मुख्य पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कलिंगड, खरबूज यासारख्या हंगमी पिकावर भर दिला होता. सर्वकाही सुरळीत असताना मध्यंतरीची अवकाळी पुन्हा शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरलेली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे कलिंगड बहरणार हे निश्चित होते पण अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामध्ये कलिंगड उबदारी आलेच नाही.

Latur : ऊन - पावसाच्या खेळात हंगामी पिकेही धोक्यात, कलिंगडच्या उत्पादनात घट
बदलत्या वातावरणामुले कलिंगड उत्पादनावर परिणाम होतोय.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 2:27 PM

लातूर : निसर्गाच्या लहरीपणापुढे सर्वकाही व्यर्थ आहे. खरिपासह रबी हंगामात देखील मुख्य पिकांच्या (Production Reduce) उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात (Watermelon) कलिंगड, खरबूज यासारख्या हंगमी पिकावर भर दिला होता. सर्वकाही सुरळीत असताना मध्यंतरीची (Unseasonable Rain) अवकाळी पुन्हा शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरलेली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे कलिंगड बहरणार हे निश्चित होते पण अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामध्ये कलिंगड उबदारी आलेच नाही. पावसामुळे जमिनीवर ओल राहिल्याने कलिंगडची नासाडी होत आहे. तर नासलेले कलिंगड हे फेकून दिल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच शिल्लक नाही. त्यामुळे हंगामी पिकातून झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्नही अयशस्वी होताना दिसत आहे.

रमजान महिन्याचे मुहूर्तही साधता आले नाही

कलिंगड हे हंगामी पीक असून लागवड केल्यापासून दोन ते अडीच महिन्यामध्ये पदरी पडते. कालावधी ठरलेला असल्याने शेतकरी तीन टप्प्यामध्ये याची लागवड करतात. कडक ऊन्हामध्ये विक्री करता यावी यासाठी तसेच उन्हाळ्यामध्ये रमजानचा पवित्र महिना असतो. या कालावधीत कलिंगडला अधिकची मागणी असते. या दरम्यान काढणी करता यावी असे शेतकऱ्यांचे नियोजन असते. पण आता निसर्गाच्या लहरीपणामुळे मागणी असतानाही कलिंगड बाजारपेठेत दाखल करता येणार नाही ही वस्तूस्थिती आहे. सध्या कलिंगडला 12 ते 14 रुपये किलो असा दर आहे. पण अपेक्षित उत्पादन पदरी पडत नसल्याने उत्पादकांची निराशा होत आहे.

ऊन-पावसाचा नेमका परिणाम काय?

वातावरणातील बदलाचा परिणाम आता हंगामी पिकांवरही पाहवयास मिळत आहे. कलिंगडमधून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची अपेक्षा होती पण अवकाळी पावसाचे पाणी कलिंगड शेतीवर साचून राहिल्याने त्याची नासाडी झाली आहे तर आता तोडणीच्या दरम्यान उन्हाच्या झळा वाढत आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी झपाट्याने खलावत आहे. या सर्व बाबींचा परिणाम आता कलिंगड उत्पादनावर होत आहे.

बाजारपेठेत कलिंगडचे चित्र काय?

वाढत्या उन्हाबरोबर बाजारपेठेत मागणी वाढली आहे. पण स्थानिक पातळीवर कलिंगडचे उत्पादन घटल्यामुळे सध्या लातूरच्या फळ मार्केटमध्ये उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई या भागातून आवक सुरु झाली आहे. प्रति कोलो 14 रुपये हा सरासरी दर आहे. त्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांचे साधले आहे. अजूनही तोडणी हंगाम बाकी आहेत. पण वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम कलिंगडच्या दरावर होतो. त्यामुळे काही दिवस असेच कडाक्याचे उन राहिले तर मात्र, शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत बागवान रफीक शेख यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या :

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!

Grape Season : द्राक्ष हंगाम कडूच, फळबागायत शेतकरीही कर्जबाजारी, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र काय?

Chickpea Crop : ‘नाफेड’ चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.