AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खरीप पेरणी अंतिम टप्प्यात, संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी साधले उद्दिष्ट..!

काळाच्या ओघात पुणे जिल्ह्यातही पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र वाढत आहे. मध्यंतरी सततच्या पावसामुळे लागवड रखडली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून भर पावसात लागवडीचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. शिवाय भात लावणी करताना शेतकऱ्यांकडून पारंपारिक भलरीची गीत गायली जात  असल्यानं परिसरातून भलरीचे सूर कानावर पडत आहे.

Kharif Season : खरीप पेरणी अंतिम टप्प्यात, संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी साधले उद्दिष्ट..!
पुणे जिल्ह्यात भात लागवडीचे काम अतिम टप्प्यात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 9:32 AM
Share

पुणे : यंदा हंगामापूर्वीच वरुणराजाचे आगमन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सबंध जून महिना तर कोरडाठाक गेला पण आता सरासरी ऐवढ्या क्षेत्रावर (Kharif Sowing) खरिपाचा पेरा होणार की नाही अशी स्थिती सबंध राज्यात निर्माण झाली होती. पेरणीचे मुहूर्त तर टळले होते पण जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात (Heavy Rain) पावसाने असा काय धूमाकूळ घातला की, पेरलेले पीकही पाण्यात आणि आता वेळ निघून गेल्यावर पेरणीसाठी पोषक वातावरण नसतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी उद्दिष्ट गाठले आहे. केवळ भात लागवडच नाहीतर उर्वरित सोयाबीन, कापूस, मूग या खरिपातील पिकांचा पेराही वाढला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होईल पण सरासरीच्या तुलनेत खरिपाचा पेरा झाला आहे. (Pune Farmer) पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि भोर तालुक्यात भात लावणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

पावसाच्या पुनरागमनामुळे सर्वकाही साध्य

हंगामाच्या सुरवातीला पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली असली तरी जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरिपाचे चित्रच बदलले आहे. अतिरिक्त पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद ही पिके पाण्यात असली तरी आता सुधारणा होत आहे. पण पाऊसच बरसला नसता तर खरिपाचे चित्र काही वेगळेच राहिले असते. पुणे जिल्ह्यातील भाताचे आगार म्हणून ओळख असलेल्या वेल्हा आणि भोर तालुक्यात भात लावणीची कामं आता अंतिम टप्प्यात आलीयेतं, या विभागातील जवळपास 80टक्के भात लावणी पूर्ण झालीयं.जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच भात लावणीसाठी समाधान कारक पाऊस झाल्यानं भात लावणीची कामं वेळेवर पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे.

पीक वाढीसाठी शर्थीचे प्रयत्न

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पिकांची फवारणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती तर पेरणी क्षेत्रात तणाचा जोरही वाढला होता. यावर पर्याय म्हणून आता किटकनाशकाची फवारणी त्याचबरोबर शेती मशागतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. एकरी हजारो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी बियाणे जमिनीत गाढले आहे. त्याचे उत्पादनात रुपांतर करण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असीच काही दिवस राहिली तर खरिपातील पिके जोमाने वढतील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

भात लागवड अंतिम टप्प्यात

काळाच्या ओघात पुणे जिल्ह्यातही पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र वाढत आहे. मध्यंतरी सततच्या पावसामुळे लागवड रखडली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून भर पावसात लागवडीचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. शिवाय भात लावणी करताना शेतकऱ्यांकडून पारंपारिक भलरीची गीत गायली जात  असल्यानं परिसरातून भलरीचे सूर कानावर पडत आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून आता उत्पादनात वाढ व्हावी हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.