एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 6:30 PM

मुंबई : शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. (Change in agricultural system) उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे. (integrated farming system) एकात्मिक शेती पध्दत आता रुजत असून नवनविन प्रयोगांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

अनेक शेतकरी हे एकत्र येत विविध पीकाचे उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळेपर्यंत एकत्रीत शेती करुन लाखोंची कमाई करीत आहेत. त्यामुळे एकात्मिक शेती म्हणजे काय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा विकास झाला आहे ते आपण पाहणार आहोत.. पारंपारिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी हे सुरुवातीला नवीन मॉडेल स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, परंतु नफा कमावण्यास सुरुवात झाली की यामध्येच वेगवेगळे उपक्रम करतात. अशाच प्रकारचे एक मॉडेल आहे एकात्मिक शेती. मोठ्या संख्येने शेतकरी हे शेत जमिन दत्तक घेतात आणि उत्पादनात वाढ करीत आहेत.

एकात्मिक शेती म्हणजे काय?

एकात्मिक शेती ही लहान-मोठे शेतकरी एकत्र य़ेऊन केली जाणारी अत्याधुनिक शेती पध्दत आहे. शिवाय मोठे शेतकरीही या प्रणालीद्वारे शेती करून नफा कमवू शकतात. एकात्मिक कृषी व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट शेतजमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर करणे हा आहे. यामध्ये शेतकरी हे एकाच वेळी वेगवेगळी पिके, फुले, भाज्या, गुरांचे संगोपन, फळउत्पादन, मधमाशीपालन, मत्स्यपालन इत्यादी करू शकता. यातून केवळ उत्पादन वाढविणे हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संसाधनांचा पूर्ण वापर करुन उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रीत केले जाते. खर्च कमी आणि उत्पादकता अधिक हाच उद्देश या एकात्मिक शेती पध्दतीचा आहे. एकात्मिक कृषी व्यवस्था पर्यावरणपूरक असून शेतीची खतशक्तीही वाढवते.

एकात्मिक शेतीचा फायदा काय?

– उत्पादकता वाढते. – शेतकरी अधिकाधिक नफा कमावतात. – शेतीच्या कामांचा खर्च कमी करतो. – शेताची खत क्षमता वाढते. – संरचनांचा संपूर्ण वापर होतो. – जोखीम कमी असते. – रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

एकात्मिक शेता नेमकी कशी केली जाते?

झारखंडची राजधानी रांची जिल्ह्यात एका गावात शेतकरी एकात्मिक शेती करत आहेत. ते पाच एकर जमिनीवर धानासह फुले आणि भाजीपाला पिके घेत आहेत. याशिवाय येथे मासे शेती, कुक्कुटपालन, शेळी पालन आणि दूधही तयार केले जात आहे. येथील शेतकरी सांगतात की, ते गरजू शेतकऱ्यांना कृषी अवजारेही भाड्याने देतात. त्यातूनही त्यांना उत्पन्नही मिळत राहते. शेतकऱ्याच्या मते पाच एकर जमिनीवर अनेक पिके, फुले, भाज्या आणि पशुसंवर्धन असे व्यवसाय केले जात आहेत.

शिवाय जनावरांच्या चाऱ्याची कमतरता नाही आणि त्यांच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो. वेगवेगळ्या पिकांच्या पेरणीमुळे शेताची खतशक्ती वाढते आणि उत्पन्नही वाढते. एकात्मिक शेती पध्दतीमुळे दरवर्षी पाच एकरात 8 लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. (Increase in production due to integrated farming system and development of farmers also)

संबंधित बातम्या :

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.