पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

शनिवारी मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पीकाला करपा रोगाचा धोका निर्माण झाला आहे. (Outbreak of Karpa disease on onions) शिवाय खरीपातील सोयाबीनची काढणी कामे सुरु आहेत.

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच...
संग्रहीत छायाचित्र

लातूर : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत हवेचे आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याच्या प्रभावामुळे मराठवाड्यात शनिवारपासून पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. (Rain forecast, ) मात्र, शनिवारी मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पीकाला करपा रोगाचा धोका निर्माण झाला आहे. (Outbreak of Karpa disease on onions) शिवाय खरीपातील सोयाबीनची काढणी कामे सुरु आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी पावसाने उघडीप दिली असली तरी या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे…

यंदाच्या हंगमात पावसाबाबतचे सर्व अंदाज हे खरे ठरले आहेत. शिवाय पावसामुळे खरीपातील पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे हा अंदाज तरी अचूक ठरु नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पहिल्या दिवशी तरी पावसाने मराठवाड्यात हजेरी लावलेली नाही. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण हे कायम होते. या ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. तर उर्वरीत दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर काढणी झालेल्या पीकांचीही सुरक्षा महत्वाची आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम हा कांद्याच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

काय आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला..

17 ऑक्टोंबरपासून पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे 10 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमीत कमी काढणी करून घेणे आवश्यक आहे. काढणीनंतर सोयाबीनची साठवणूक ही सुरक्षित ठिकाणी करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशाच ठिकाणी सोयाबीनची बनीम लावावी लागणार आहे. अन्यथा ओलीमुळे सोयाबीनला बुरशी लागण्याचा धोका निर्माण होतो. जर पावसाने उघडीप दिली तर यंत्राच्या सहायाने लागलीच मळणी करणे आवश्यक आहे. भविष्यातही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

शेतकरीही तत्पर

गेल्या काही दिवसांपासून पावसाचे अंदाज हे अचूक ठरत आहेत. पूर्वी अशा अंदाजाकडे शेतकरी डोळेझाक करीत होता. पण यावेळी अधिकचा पाऊस झाल्याने खऱीपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी पीकांच्या सुरक्षतेची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे होणारे नुकसान टळत आहे. अजूनही दोन दिवस हे पावसाचेच असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे अवाहन कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी केले आहे. (Rain averted, cloudy weather leads to outbreak of Karpa disease on onions, advises farmers)

संबंधित बातम्या :

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI