AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

e-NAM : शेतकऱ्यांना आता एकाच छताखाली सर्व सुविधा, बियाणांपासून बाजारपेठेपर्यंतची सर्व माहिती एकाच अॅपवर

सुविधांचा आभाव असल्यामुळे शेती व्यवसयामध्ये प्रगती होत नाही. शिवाय पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. बदलत्या काळाप्रमाणे शेतकरी आणि शेतीपध्दतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. e-NAM ही सेवा कार्यन्वित झाल्यावर देशभरातील शेतकरी, शेतकरी संघटना आणि शेती उत्पादक कंपन्या ह्या जुडल्या जाणार आहेत.

e-NAM : शेतकऱ्यांना आता एकाच छताखाली सर्व सुविधा, बियाणांपासून बाजारपेठेपर्यंतची सर्व माहिती एकाच अॅपवर
e-NAM App
| Updated on: Feb 11, 2022 | 3:41 PM
Share

मुंबई : सुविधांचा आभाव असल्यामुळे शेती व्यवसयामध्ये प्रगती होत नाही. शिवाय पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. बदलत्या काळाप्रमाणे शेतकरी आणि शेतीपध्दतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने (Central Government) सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. e-NAM ही सेवा कार्यन्वित झाल्यावर देशभरातील शेतकरी, शेतकरी संघटना आणि (Farm Producer Company ) शेती उत्पादक कंपन्या ह्या जुडल्या जाणार आहेत. याच अॅपवर (National Agricultural Market) राष्ट्रीय कृषी बाजाराशी शेतकरी जुडले जाणार असून एकाच ठिकाणी सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. वाहतूक, रसद, हवामान अंदाज आणि फिन्टेक सेवा अशा खासगी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर e-NAM-नामशी संलग्न शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. या माध्यमातून 1 कोटी 75 लाख शेतकरी जुडले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हीतासाठी अत्याधुनिक प्रणाली

e-NAM चे डिजिटल इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1 कोटी 75 लाख नोंदणीकृत शेतकरी, शेती उत्पादक कंपन्या, व्यापारी, कमिशन एजंट्स आणि इतर भागधारक e-NAM प्लॅटफॉर्मसह या सेवांचा लाभ घेऊ शकतात. याबाबत स्मॉल फार्मर्स अॅग्री बिझनेसचे एमडी नील कमल दरबारी यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, e-NAM अंतर्गत या इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर देणाऱ्या बाजार पेठांचा शोध घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीक पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सेवा मिळणार आहे.

2016 पासून सुरु आहेत प्रयत्न

शेतकऱ्यांना कोणत्याच समस्या उभ्या राहू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. e-NAM या एकाच प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त सेवा प्रदात्यांना शेतकऱ्यांना जोडले जात आहे. ई-नाम संलग्न शेतकऱ्यांना पर्यायांची कमतरता भासू नये आणि त्याच्याशी जोडून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात, हा यामागील हेतू आहे. ई-नाम प्लॅटफॉर्म एप्रिल 2016 मध्ये लाँच करण्यात आला होता. सध्या 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 10 बाजार समित्या जोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या पोर्टलवर 1 कोटी 72 लाख शेतकरी, 2 हजार 50 शेतकरी उत्पादक कंपन्या, 2 लाख 13 हजार व्यापारी आणि सुमारे 1 लाख कमिशन एजंट्सची नोंदणी आहे. मात्र, या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर राज्यात शेतमाल विकण्यासाठी देण्यात आलेल्या सुविधेला गती मिळालेली नाही.

शेतकरी उत्पादक कंपनीच प्रभावी माध्यम

सध्या सुमारे 530 बाजार समित्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने व्यापार सुरु आहे. तर संबंधित राज्यासाठी वैध असलेले सुमारे 97 हजार परवाने ई-नाम प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत 2 लाख व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अॅपवर अन्नधान्य, तेलबिया, मसाले, फळे आणि भाज्यांचा व्यापार केला जातो. एसएफएसीचे एमडी दरबारी यांनी सांगितले की, या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशभरातील त्यांच्या उत्पादनाच्या किंमती याची माहिती मिळणार आहे. यामुळे शेतीमालाची विक्री केव्हा करायची याची माहिती मिळते. देशात बहुतेक लहान शेतकरी आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी हे जोडले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यावरच सरकारचा भर राहणार आहे.

संबंधित बातम्या :

एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर ‘नवा’ पर्याय

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.