एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर ‘नवा’ पर्याय

यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडेच राहिलेला आहे. खरिपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरवातील अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पध्दतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्व दिले जाते त्या भागातील 8 जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या ज्वारी पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडलेला आहे.

एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर 'नवा' पर्याय
राजमा पीक
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:39 PM

उस्मानाबाद : यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडेच राहिलेला आहे. खरिपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरवातील (Untimely Rain) अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पध्दतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्व दिले जाते त्या भागातील 8 जिल्ह्यामध्ये (Main Crop) मुख्य पीक असलेल्या ज्वारी पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी (Rajma Crop) राजम्याचा पर्याय निवडलेला आहे. राजमा हे उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे पीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घेवडा म्हणून हे परिचित आहे. आता मराठवाड्यातही या रब्बी हंगामापासून याचे क्षेत्र वाढले आहे. एकरात 25 किलो बियाणे आणि सरासरी 8 क्विंटलचे उत्पादन शिवाय बाजारपेठेत मागणी असल्याने शेतकरी या पिकाकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून राजम्याची ओळख होत आहे.

उपलब्ध पाण्याचा योग्य वापर

दरवर्षी रब्बी हंगामात पाण्याची टंचाई असते. यंदा मात्र, सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असून त्याचा उपयोग आता रब्बी हंगामातील पिकांसाठी होत आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे क्षेत्रही वाढले असून पिकांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा राजम्याचे क्षेत्र वाढलेले आहे. खरिपात झालेले नुकसान या पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

एकरी 8 क्विंटल उताऱ्याची अपेक्षा

ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे तो उद्देश आता साध्य होताना दिसत आहे. सध्याचे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक आहे. राजमा या पिकाचा नवा पर्याय असला तरी याकरिता एकरी 25 किलो बियाणे लागले आहे. त्यानुसार एकरी 8 क्विटल उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शिवाय बाजारपेठेत राजमा ला प्रति क्विंटल 6 हजराचा दर आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांमधून जे उत्पन्न घटत होते ते भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा प्रयोग केला आहे. गतवर्षी केवळ हा प्रयोग होता पण उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असल्याचे भूम येथील शेतकरी भाऊराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

जोखीम पत्करुन शेतकऱ्यांनी केले धाडस

उन्हाळी हंगामात सोयाबीनचाही पेरा वाढला आहे याला पर्याय म्हणून राजमा पिकाचेही उत्पादनही शेतकऱ्यांनी घेतल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. हे जोखीमाचे पीक असले तरी यातून उत्पन्न अधिकचे मिळते म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला असला तरी पिके बहरात आहेत. शिवाय सध्या राजमाला प्रति क्विंटल 9 हजाराचा दर आहे. भविष्यात आवक वाढली तरी 7 हजार रुपये दर कायम राहिल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.