Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

गेल्या चार महिन्यांपासून बाजारपेठेत केवळ कापूस आणि सोयाबीनचाच बोलबाला होता. खरिपातील या दोन मुख्य पिकांचाच शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याचाही श्रीगणेशा झाला आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. सध्या पहिल्या पेऱ्यातीलच पिकाची आवक होत असली ती खुल्या बाजारातील दर हे शेतकऱ्यांची निराशा करणारेच आहेत.

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:56 PM

लातूर : गेल्या चार महिन्यांपासून बाजारपेठेत केवळ कापूस आणि सोयाबीनचाच बोलबाला होता. खरिपातील या दोन मुख्य पिकांचाच शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून (Rabi Season) रब्बी हंगामातील (Chickpea Arrival) हरभऱ्याचाही श्रीगणेशा झाला आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. सध्या पहिल्या पेऱ्यातीलच पिकाची आवक होत असली ती (Open Market) खुल्या बाजारातील दर हे शेतकऱ्यांची निराशा करणारेच आहेत. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये सरासरी दर मिळत आहे. तर दुसरीकडे खरिपातील सोयाबीनचे दर हे कासवगतीने वाढत आहे. सोयाबीनला शुक्रावरी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 400 रुपये पोटलीत दर मिळाला. आता रब्बी हंगामातील पिकांचीही आवक सुरु होत असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्षा हमीभाव केंद्राची

रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु झाली आहे. शिवाय सुरवातीच्या काळातच थेट 15 हजार पोते लातूर कृषी उत्पन्न बाजार पेठेत दाखल होत आहेत. असे असले तरी सध्या हरभऱ्याला केवळ 4 हजार 500 रुपये दर मिळत आहे. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 300 रुपये दर निश्चित केला आहे. सध्या हमीभाव आणि खुल्या बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या केवळ पहिल्या टप्प्यातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. अजून आठ दिवसांनी दुपटीने आवक होणार आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राची यंत्रणा आणि प्रत्यक्षात सुरवात करण्याची प्रक्रिया पाहता आताच हमीभाव केंद्र सुरु झाले तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

विक्रमी पेऱ्यामुळे आवक कायम राहणार

रब्बी हंगामात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ज्वारी-गहू या मुख्य पिकांकडे पाठव फिरवली आहे. यंदा हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे आवकही त्याचप्रमाणात राहणार आहे. भविष्यात आवक वाढली तर खुल्या बाजारपेठेतील दर अणखीनच कमी होतील. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हमीभाव केंद्राचा आधार शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. सध्या तुरीची हमीभाव केंद्र आहेत पण खुल्या बाजारातील आणि हमीभाव केंद्रावरील दर हे समानच असल्याने शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहेत.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील तूर आणि सोयाबीनची तर आता नव्याने रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा असून शुक्रवारी सोयाबीन 6 हजार 400 तर तुरीला 6 हजार 100 असा दर मिळाला होता. हरभऱ्याची आवक जास्त होत असून 4 हजार 500 रुपये दर आहेत.

संबंधित बातम्या :

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पेरले-उगवले अन् बहरात असतानाच पीक जळून गेले, नेमके मका पिकाबाबत असे झाले तरी काय?

Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.