AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

उत्पादनात वाढ व्हावी म्हणून एक ना अनेक प्रयत्न केले जातात. मोसंबी फळ लागवडीपासून ते बाग बहरात येईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रयत्न त्यासाठीच असतात. मात्र, याच वाढलेला फळधारणेचा परिणाम थेट झाडांवर होत असतो. त्यामुळे झाडांची नासधूस होते. मोसंबी झाडाच्या वयाचा कसलाही विचार न करता शेतकरी हे उत्पादनवाढीवरच भर देतात.

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 11, 2022 | 1:11 PM
Share

जालना : उत्पादनात वाढ व्हावी म्हणून एक ना अनेक प्रयत्न केले जातात. (Mosambi Cultivation) मोसंबी लागवडीपासून ते बाग बहरात येईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रयत्न त्यासाठीच असतात. मात्र, याच वाढलेला फळधारणेचा परिणाम थेट झाडांवर होत असतो. त्यामुळे झाडांची नासधूस होते. मोसंबी झाडाच्या वयाचा कसलाही विचार न करता शेतकरी हे (Increase Production) उत्पादनवाढीवरच भर देतात. क्षमतेपेक्षा अधिकची फळधारणा घेण्याचा प्रयत्न झाला तर मात्र, झाडांच्या आयुष्यावर तर परिणाम होतोच पण फळाचा दर्जा खालावला जातो. एका वेळच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कायमचे नुकसान करुन घेणे हे हीताचे नाही. त्यामुळे (Capacity of Mosambi Trees) मोसंबी झाडांची क्षमता आणि लागवडीपासूनचा कालावधी या दोन बाबी लक्षात ठेऊनच शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे मत कृषी शास्त्रज्ञ डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ही आहेत झाडे कमकुवत होण्याची कारणे

पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यातील फळ बागांची झाडे ही लवकर कमकुवत होतात. याची कारणेही तशीच आहेत. येथील डोंगराळ भागात ऊनाची तीव्रता लागलीच जाणवते. शिवाय सिंचनाचे क्षेत्र आणि सोई-सुविधा अद्यापही बांधापर्यंत पोहचलेल्या नाहीत. झाडांचे वय कमी असताना अधिकची फळधारणा झाली तरी मोसंबीची झाडे कमकुवत होऊन वाळून जातात. त्यामुळे आगामी काळात ते झाड वांझोटे होते. फळच लागत नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाला मुकावे लागते. त्यामुळे झाड वावरात उभे असतानाच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

झाडाच्या वयाचाही विचार गरजेचा

शेतकऱ्यांकडून उत्पादन वाढीचे प्रयत्न तर मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. अगदी लागवडीपासूनच मार्केटचाही विचार केला जातो. अधिकच्या उत्पादनासाठी शेतकरी ना फळझाडांचा विचार करीत आहे ना शेतजमिनीच्या पोताचा. केवळ उत्पादनच नाही तर त्याबरोबर शेतजमिनीचे आरोग्यही महत्वाचे आहे. अधिकच्या फळधारणेमुळे दरवर्षी एका एकरातील किमान 2 ते 3 झाडांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी झाडाच्या वयाच्या विचार करुन फळधारणा घेणे महत्वाचे असल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले आहे.

उत्पादकतेवरही परिणाम

क्षमतेपेक्षा अधिकच्या फळधारणेमुळे झाडे कमकुवत होऊन वाळून जातात. त्यामुळे बागेतील झाडांची संख्या ही वर्षानुवर्षे कमी होत जाते. हे न लक्षात येणारे नुकसान असले तरी याचा उत्पादनावर परिणाम होतो. तूट पडून प्रतिहेक्टरी उत्पादनात घट ही होतेच.

संबंधित बातम्या :

पेरले-उगवले अन् बहरात असतानाच पीक जळून गेले, नेमके मका पिकाबाबत असे झाले तरी काय?

Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक

Sugarcane Sludge : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा ‘गोडवा’ पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.