KCC : किसान क्रेडिट कार्ड कसं काढायचं? आवश्यक कागदपत्रं नेमकी कुठली?

पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. कोरोना काळात दोन कोटी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आली आहेत.

KCC : किसान क्रेडिट कार्ड कसं काढायचं? आवश्यक कागदपत्रं नेमकी कुठली?
किसान क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 1:04 PM

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागते. पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. कोरोना काळात दोन कोटी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आली आहेत.

KCC साठी महत्त्वाचे कागदपत्रे

वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. (Kisan Credit Card) याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

जुन्या कर्जाची माहिती देणं आवश्यक

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड कसं बनवणार?

केंद्र सरकारन किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे.  बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्डला अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावा. तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा. केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.

सावकारांपासून सुटका करण्याचा प्रयत्न

नरेंद्र मोदी सरकारचे 2022 पर्यंत दुप्पट उत्पन्न करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीनं शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न आहे.बँकेकडून कर्ज घेऊन शेतकरी शेती करतील, असं सरकारचे उद्दिष्ठ आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी 47 हजारांचे कर्ज आहे यामधील 12130 रक्कम सावकारांकडून घेतलेली आहेत.

शेतकरी क्रेडिट कार्ड कोण बनवू शकतं?

शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो. कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार

ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरुच

Kisan Credit Card know how to make KCC and which document needed

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.