कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दुसऱ्यांदा उघडले; 10264 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरु

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणातील पाणी नदीपात्रात विसर्ग करणेचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला.

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे  दुसऱ्यांदा उघडले; 10264 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरु
कोयना धरण


सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणातील पाणी नदीपात्रात विसर्ग करणेचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. कोयना धरणाचे सहाही वक्री दरवाजे दुसऱ्यांदा एक फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 9214 कयुसेक तर पायथ्या वीजगृह मधून 1050 कयुसेक असा एकूण 10264 कयुसेक पाणी विसर्ग सुरु केला आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 103.84 टीएमसी पाणी साठा आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास दरवाजे आणखी उचलेले जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणातील पाणी साठा शंभर टीएमसीच्या वर गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढणार

कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणात पाणीसाठा 103.84 टीएमसी झाला आहे. धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सुरुवातीला पायथा वीजृगृहातून पाणी सोडण्याचा निर्णय

कोयना धरणातील पाणी साठा 100 टीमएमसीच्या वर गेल्यानंतर नंतर धरण व्यवस्थापनानं कोयना पायथा वीजगृहातुन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोयना धरण पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरु असून कोयना धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरु करुन 1050 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटांन उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्यानं धरण व्यवस्थापनानं धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फुटानं उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना धरण व्यवस्थापानानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून दुपारी 2 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कराड सांगलीकरांची चिंता वाढणार?

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर कोयना नदीकाठच्या गावांसह कराड आणि सांगलीत देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यात असल्यानं तेथील नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील पावसाची स्थिती कशी?

भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.त सेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

इतर बातम्या:

येवल्यात 3 रुपये तर मुंबईत किलोला 9 रुपये दर, भाव पडल्यानं मिरचीचा ठसका शेतकऱ्यांना

सरसकट पीकविमा मंजूर करा, पंचनाम्यासाठी वेळ घालवू नका, नांदेडच्या खासदारांची ठाकरे सरकारकडं मागणी

हेही पाहा

Koyna Dam Management Said Water released from six doors of dam issue alert to peoples

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI