Onion Price: कांद्याच्या भावात अचानक घट, नेमकं कारण काय?

जे शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करुन सहा महिने शेतात राबून कांद्याचे उत्पन्न घेतात, त्यांना प्रति क्विंटलमागे केवळ 1400 रुपये इतका दर दिला जातो.

Onion Price:  कांद्याच्या भावात अचानक घट, नेमकं कारण काय?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 11:54 AM

मुंबई : जर तुम्ही बाजारात कांदा खरेदी करायला गेलात तर त्याचा दर 40 रुपये प्रतिकिलो इतका आहे. मात्र शेतकऱ्यांना याचा किती भाव मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? जे शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करुन सहा महिने शेतात राबून कांद्याचे उत्पन्न घेतात, त्यांना प्रति क्विंटलमागे केवळ 1400 रुपये इतका दर दिला जातो. तर उर्वरित पैसे हे दोन चार व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडे जातात. सध्या देशातील बर्‍याच भागात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, यामागे काही मध्यस्थ आणि मोठ्या मंडईच्या व्यापाऱ्यांचा हात आहे. (latest agriculture news Onion Price In New Crisis hit on the Maharashtra farmers cost of production increase)

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक होल्डर्सलाही कांद्याच्या किंमती खाली यावे असेच वाटत असते. कारण किंमती खाली आल्या तर ते अधिक कांदा खरेदी करतात. तर नंतर त्याची किंमत वाढली की तो विकून मोठा नफा कमवतात ही अनेक होर्डरची रणनिती असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर खाली येत आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

आवक वाढण्यामागचे कारण काय?

बहुतेक मंडईंमध्ये कांद्याची आवक सामान्य असते. काही मंडळांमध्ये आवक नक्कीच वाढली आहे, पण त्यामागे एक कारण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये जवळपास एक लाख गोणी कांद्याची आवक झाली, तर साधारणत: येथे फक्त 40-50 हजार पोत्या येतात. कोरोनामुळे सहा दिवसांऐवजी येथे फक्त 2 दिवस लिलाव होत आहे. ज्या दिवशी आवक जास्त झाली त्यादिवशी व्यापाऱ्यांनी हा दर कमी करुन 1400 रुपये प्रतिक्विंटल केला. तर त्याच दिवशी सोलापूरच्या बाजारात 2000 रुपयांचा दर होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

कांद्याचा दर वाढण्यामागचे कारण काय? 

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये  मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडला आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या अनेक रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. यामुळे किंमत जास्त आहे. याच संधीचा काही व्यापारी फायदा घेत आहे. विशेष म्हणजे येत्या महिनाभरात कांद्याचा दर हा 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतो.

नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये कांद्याची चांगली बाजारपेठ आहे. त्याचा काही शेतकरी फायदा घेत आहे. तर धुळे, जळगाव, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा आणि अकोला येथेही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र या ठिकाणी मोठी बाजारपेठ नसल्यामुळे तेथील शेतकरी त्रस्त आहेत.

कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विका

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा 310 डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

भारतात कांदा उत्पादनाची थोडक्यात माहिती

महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान हे त्याचे प्रमुख उत्पादक आहेत. देशात सरासरी वार्षिक कांदा उत्पादन 2.25 ते 2.50 कोटी मेट्रिक टन दरम्यान आहे. कांदा उत्पादित करणारे महाराष्ट्र सर्वात मोठे राज्य आहे. दर वर्षी किमान 15 दशलक्ष मेट्रिक टन कांदा विकला जातो. तसेच सुमारे 10 ते 20 लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीमुळे खराब होतो. सरासरी 35 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Export) केला जातो.

(latest agriculture news Onion Price In New Crisis hit on the Maharashtra farmers cost of production increase)

संबंधित बातम्या : 

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक; न्यायासाठी हेलपाटे सुरूच

हिम्मत केली, धाडस दाखवलं, नव्या प्रयोगाने मालामाल केलं, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी लखपती!

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.