AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाने नव्हे तर शेतकऱ्याच्या मनमानी कारभारामुळे 40 एक्कर क्षेत्र बाधित, काय आहे नेमकं प्रकरण ?

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यतील मालेपाडा येथे हा प्रकार समोर आला आहे. येथील शिवारात डेअरी फार्मचा व्यवसाय आहे आणि यामध्ये तब्बल 400 जनावरे आहेत. मात्र, या जनावरांचे शेण साठवण्यासाठी ना गोठा हा ना कोणती व्यवस्था त्यामुळे सर्व शेण आणि मूत्र हे थेट लगतच्या शेतामध्ये साठत आहे. या तबेल्याला लागून सर्व भातशेती आहे. जवळपास 40 एकरातील भातशेतीचे नुकसान या शेतकऱ्यानुळे झालेले आहे.

पावसाने नव्हे तर शेतकऱ्याच्या मनमानी कारभारामुळे 40 एक्कर क्षेत्र बाधित, काय आहे नेमकं प्रकरण ?
पाणी साचल्याने भात पिकाचे नुकसान
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 3:05 PM
Share

पालघर : सध्या शेती नुकसान म्हणलं की ते (Loss of agriculture,) नुकसान पावसानेच झाल असणार. यात काय वेगळेपण नाही. पण एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे तब्बल 40 एक्कर शेतीक्षेत्र हे नापिक झाले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे. (Water stored) मात्र, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यतील मालेपाडा येथे हा प्रकार समोर आला आहे. येथील शिवारात डेअरी फार्मचा व्यवसाय आहे आणि तबेल्यामध्ये तब्बल 400 जनावरे आहेत. मात्र, या जनावरांचे शेण साठवण्यासाठी ना गोठा हा ना कोणती व्यवस्था त्यामुळे सर्व शेण आणि मूत्र हे थेट लगतच्या शेतामध्ये साठत आहे. या तबेल्याला लागून सर्व भातशेती आहे. जवळपास 40 एकरातील भातशेतीचे नुकसान या शेतकऱ्यानुळे झालेले आहे. एकीकडे निसर्गाच्या

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मालेपाडा गावाच्या हद्दीत मुकुंद गोपी डेअरी फार्म मध्ये 400 च्या आसपास गायी व म्हशींचा तबेला आहे. जनावरांचे शेण आणि मूत्र एका नाल्याद्वारे संबंधित तबेला मालकाने लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यामुळे लागवड केलेलं भातपीक संपूर्णपणे वाया गेलं आहे. येथील 25 हून अधिक शेतकऱ्यांचे 35 ते 40 एकर लागवडीचे क्षेत्र बाधीत झाले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर भातशेतीचं नुकसान झाल्याने येथील आदिवासी शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर

भातशेती जोमात आहे. निसर्गाचा सामना करीत पीक डोलात ऊभे आहे. मात्र, येथील अदिवासी शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. याच शेतीवर उदरनिर्वाह असून शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीकाचे नुकसान होत आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ पिकाच्या रुपाने हाती येईल या आशेत असलेल्या या शेतकऱ्यांवर उभं पिक वाया गेल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेती हेच उपजीविकेचं एकमेव साधन असल्याने आणि आता ही मोठ्या कष्टाने लागवड केलेली शेतीच वाया गेल्याने पुढे जगायचं कसं हे सांगताना येथील आदिवासी महिलांना हुंदका आवरता आला नाही.

गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण?

या प्रकाराबद्दल स्थानिक प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली आहे. गतवर्षीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कल्पना थोरात यांच्या मुलीचा विवाह होतो की नाही अशी अवस्था असताना गावकऱ्यांनी मदत केल्याने तो सोहळा पार पडला होता. एवढ्या मोठ्याप्रमाणावर शेतीचं नुकसान हे शेतकरी झेलत असताना मात्र संबंधित तबेला मालक कोणाकडेही माझी तक्रार करा, मी घाबरत नाही असे म्हणत या बाधीत शेतकऱ्यांनाच उलट धमकावत असल्याचे ह्या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.

बंदोबस्त करण्याची मागणी

शेतकरी हे विनंती करुन थकलेले आहेत. तबेला मालकाच्या एका चुकीमुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे पण शेतकऱ्यांवरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे यावर प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच तबेला चालकावर कारवाई करुन नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत. (Loss of rice crop in 40 acres due to the land of farmer. Types of Palghar district)

 संबंधित बातम्या :

जनावरांच्या गोठ्यातूनच होतो लंम्पी आजार, प्रतिबंधात्मक उपायोजनेमुळे प्रादुर्भाव कमी

तुटपुंज्या नुकसानभरपाईचा ‘असा’ हा निषेध, सडलेल्या सोयाबीनची होळी

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.