AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाची दांडी, वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ

यंदाच्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांनी असंख्य अडचणींचा सामना करत पीक जगवलं होतं. पावसानं दिलेली ओढ, वातावरणात झालेले बदल याचा फटका यंदा सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.

पावसाची दांडी, वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ
अकोला उडीद पिकावर ट्रॅक्टर
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 1:36 PM
Share

अकोला/ उस्मानाबाद : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यंदाच्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांनी असंख्य अडचणींचा सामना करत पीक जगवलं होतं. पावसानं दिलेली ओढ, वातावरणात झालेले बदल याचा फटका यंदा सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या वातावरणीय बदलामुळे उडीद पिकाचं उत्पन्न घेणारे शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र आहे. मराठवाडा ते विदर्भ शेतकरी उडीद पिकावर रोटावेटर फिरवताना दिसत आहेत.

अकोल्यात शेकडो हेक्टरवरील उडीद खराब

अकोल्यातल्या सांगळूद येथील शेतकऱ्यांचे उडीद पिकांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे उडीद पीक हातून गेलं आहे. ऐन फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकाला फुलगळती लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोटावेटर, ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले आहे. तर काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे परिसरातील शेकडो हेक्टर पीक खराब झाले आहे.

वातावरणातील बदलाचा फटका

ऐन फुलोरा अवस्थेत असलेले उडीद पीक वातावरणातील बदलांमुळे पीक हातून गेले आहे. खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उडीद पीक ट्रॅक्टर द्वारे नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले असून लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अकोला जिल्हातल्या सांगळूद गावामध्ये उडदाचे पीक हे चांगल्या प्रकारे आले होते. परंतु, वातावरणातील बदलामुळे संपूर्ण उडीदाचा फुलोरा निघून गेला असल्याने सांगळुद येथील अरुण तायडे या शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवून उडीद पीक नष्ट केले. वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.

उस्मानाबादमध्येही चार हेक्टरवर रोटावेटर

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला. एका शेतकऱ्यानं चार हेक्टर उडीद पिकात चक्क रोटाव्हेटर फिरवून मोडीत काढले आहे. आहे त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावे लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसत असल्याने जेवळी येथील वैतागलेला शेतकरी कल्याणी संभाजी घोडके या शेतकऱ्यांने आपल्या दहा एकर क्षेत्रावर असलेल्या उडीद पीकात चक्क रोटाव्हेटर मारुन मोडीत काढला आहे.

पुण्यात पीक विमा प्रश्नी आंदोलन

पीकविम्याच्या प्रश्नावर राज्यातला शेतकरी आक्रमक झाला आहे.याच प्रश्नावरून आज पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन केले. अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले, अध्यक्ष किसन गुजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना सन 2020 च्या खरीप विम्याची रक्कम मिळावी शिवाय पीक विमा योजना ही शेतकरी हिताची असावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्यात.

इतर बातम्या:

नावात राणे, विचार चार आण्याचे, शिवसेना नेते बबनराव थोरात यांचं टीकास्त्र

विरोधकांच्या मागं ईडी, सीबीआय लावण्याचे उद्योग बंद करावेत, विनायक राऊतांचा केंद्राला इशारा

Maharashtra farmers facing problems due to climate change lack of rain udid crop loss farmers destroy crop

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.