राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?

कृषीमंत्री दादा भुसे यांनी मोठी महिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे. (maharashtra lockdown corona virus)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:22 PM, 20 Apr 2021
राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?
FARMER AND CORONA LOCKDOWN

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने राज्यात नव्याने रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडासुद्धा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाला वेळीच थोपवण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) लॉकडाऊन लागू करणार आहे. तसे संकेत आद देण्यात आले आलेयत. मात्र, राज्यात जर लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यानंतर राज्यात कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कोणत्या  बंद याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. शेतकऱ्यांनासुद्धा हीच चिंता सतावते आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दाद भुसे (Dadaji Bhuse) यांनी मोठी महिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मारठी’शी बोलत होते. (Maharashtra Government imposing Lockdown again due to Corona virus what will happen to farmers answer given by agriculture minister Dadaji Bhuse)

जिल्हा पातळीवर खास कक्ष उभारण्यात येणार

यावेळी बोलताना दादा भुसे यांनी या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना कोणताही अडचण येणार नसल्याची ग्वाही दिली. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. त्यासाठी जिल्हा पातळीवर खास कक्ष उभारण्यात येणार आहे. मागील लॉकडाऊनमध्ये शेतीशी संबधित दुकाने, शेतमाल बाजारात येण्याच्या दृष्टीने सर्व बाबींना लॉकडाऊनमध्ये सूट मिळाली होती. यावेळीही तसंच होईल, असे दादा भुसे म्हणाले.

शेतमाल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार

राज्यात लवकरच लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांच्या शेतातली शेतमाल लोकांपर्यंत तसेच बाजारात कसा पोहोचणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर बोलताना त्यांनी मागील लॉकडाऊनच्या आठवणी सांगितल्या. मागील देशव्यापी लॉकडाऊनमध्ये कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारले होते. अजूनही कोणालाही अन्नधान्य कमी पडले नाही. या यशामागे शेतकऱ्यांचे श्रेय आहे. यावेळीसुद्धा शेतमालामध्ये वाढ दिसेल. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही मागील वेळेसारखाच प्रयत्न करु असे दादा भुसे यांनी सांगितलंय.

राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सराकरने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (21 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. आज (20 एप्रिल) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

इतर बातम्या :

Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात पुन्हा कोरानाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 519 रुग्णांचा मृत्यू, तर 62 हजार 97 नवे रुग्ण

PM Narendra Modi Bhashan Highlights : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

(Maharashtra Government imposing Lockdown again due to Corona virus what will happen to farmers answer given by agriculture minister Dadaji Bhuse)