PM Narendra Modi Bhashan Highlights : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

| Updated on: Apr 20, 2021 | 9:36 PM

PM Modi's Speech LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी संपूर्ण देशाला संबोधित करत आहेत.

PM Narendra Modi Bhashan Highlights  : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi live) यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी  सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं मोदी म्हणाले.  देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा करत आहेत. मोदींची आज लस उत्पादन कंपनीशी चर्चा झाली, त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं.

जनभागीदारीतून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये, असं मोदी म्हणाले.

तरुणांना आवाहन 

“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Apr 2021 09:05 PM (IST)

    ‘कोरोना विरोधात लढण्यासाठी अनुशासनाची गरज’

    “कोरोना विरोधात लढण्यासाठी अनुशासनाची गरज आहे. गरज असेल तरच बाहेर पडा. मला आपल्याला विनंती करतो. तुमचं धैर्य आणि साहसामुळे आजच्या परिस्थिती बदलण्यास देश कोणतीही कसर सोडणार नाही. आपलं कटुंब आणि तुम्ही निरोगी राहा”, असं मोदी म्हणाले.

  • 20 Apr 2021 09:05 PM (IST)

    PM Naredra Modi LIVE : देशाला लॉकडाऊनपासून वाचवण्यासाठी आपण नियम पाळावे

    धैर्य, अनुशासन कायम ठेवून, आताची ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल, सर्वांनी नियम पाळा, देशाला लॉकडाऊनपासून वाचवण्यासाठी आपण नियम पाळावे, मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित ठेवा, सर्वांचे धन्यवाद

  • 20 Apr 2021 09:03 PM (IST)

    PM Naredra Modi lockdown : लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय

    देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. उद्या रामनवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा संदेश हाच आहे, आपण मर्यादेत राहावं. कोरोना नियमांचं पालन शतप्रतिशत करा

    दवाई भी कडाई भी हा मंत्र कायम ठेवा. रमजानच्या पवित्र महिन्याचा ७ वा दिवस आहे. रमजान धैर्य, अनुशासनाची शिकवण देतं.

  • 20 Apr 2021 09:03 PM (IST)

    'देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे'

    "माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा", असं पंतप्रधान म्हणाले.

  • 20 Apr 2021 09:02 PM (IST)

    PM Naredra Modi LIVE : अफवा आणि भ्रम पसरण्याला आळा बसवा

    स्वच्छता अभियानात बालकांनी मोठं काम केलं. आता कोरोनाकाळात विनाकाम, विनाकारण घराबाहेर पडू नका. तुमच्यामुळे आम्ही विजय मिळवू शकतो. या संकटकाळात लोकांना जी मदत केली जाते, ती वाढवा. जी भीतीदायक स्थिती आहे ती कमी होईल. अफवा आणि भ्रम पसरण्याला आळा बसेल.

  • 20 Apr 2021 09:00 PM (IST)

    PM Naredra Modi : कोरोनाचं हे तुफान उधळून लावू

    जनभागीदारीतून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू.

    युवकांनी आपल्या भागात छोट्या समित्या बनवाव्या आणि कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन व्हावं. त्यामुळे सरकारने कंटेन्मेंट झोन किंवा कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची वेळ सरकारवर येणार नााही.

  • 20 Apr 2021 08:59 PM (IST)

    सैनिकांनाही लस मिळेल

    "सैनिकांनाही लस दिली जाईल. सैनिक ज्या शहरात आहेत तिथेच त्यांना लस मिळेल आणि त्यांचं कामही बंद होणार नाही. याआधीच्या परिस्थिती वेगळ्या होत्या. तेव्हा आपल्याजवळ कोरोना विरोधात लढण्यासाठी चांगली सामग्री नव्हती. टेस्टिंग, मेडिसिन नव्हती. पण फार कमी वेळात आपण या सगळ्यांमध्ये सुधारणा केली. आज आपले डॉक्टर एक्सपर्ट झाले आहेत. ते जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचत आहेत. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पीपीई कीट आणि इतर सामग्री आहे. आपण खूप धैर्याने लढत आहोत. याचं श्रेय फक्त जनतेला जातं. जनभागीदारीच्या ताकदीने या संकटावर मात करु"

  • 20 Apr 2021 08:59 PM (IST)

    PM Naredra Modi LIVE : डॉक्टरांनी अनेकांचे जीव वाचवले

    मागील लाटेत आपल्याकडे कोरोनाविरुद्धची उपकरणं नव्हती. पण आता लस आहे. मागीलवेळी ना किट होतं, ना मोठ्या प्रमाणात यंत्रणा होती. मात्र आता आमच्या डॉक्टर्सनी कमी काळात मोठं काम केलं. त्यांनी अनेकांचे जीव वाचवले.

  • 20 Apr 2021 08:56 PM (IST)

    लसीकरण अभियान वेगात सुरु

    "लसीकरणाचं काम जोरात सुरु आहे. आपला भारत दोन मेड इन इंडिया लसींसोबत जगभरातील मोठं लसीकरण अभियान राबवत आहे. जास्तीत जास्त आणि गरजू लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात अतिशय वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. या लढाईत कोव्हिड वॉरियर, आणि वृद्धांना लस दिली गेली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. भारतात जी लस बनेल त्याचा अर्धा वाटा थेट रुग्णालय आणि देशाला मिळेल", अशं पंतप्रधान म्हणाले.

  • 20 Apr 2021 08:53 PM (IST)

    PM Naredra Modi on vaccine जगातील सर्वात स्वस्त लस भारतात - मोदी

    आपण सौभाग्यशाली आहे, आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे, जो वेगवान औषधं बनवत आहेत, रुग्णालयांमध्ये बेड संख्या वाढवत आहोत.

    आज जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. त्याची साठवणूकही योग्य होत आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. आता देशात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यामुळे शहरात जे काम करत आहेत, त्यांना सर्वांना लस मिळेल.

    माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी कामगारांना विश्वास द्यावा. ते जिथे असतील तिथेच राहावं यासाठी आवाहन करावं. त्यामुळे त्यांचं कामही सुरु राहील आणि लसीकरणही होईल.

  • 20 Apr 2021 08:52 PM (IST)

    'औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु'

    "देशात औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकारे फॉर्मा कंपनींची मदत घेतली जातेय. आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे. त्याचबरोबर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्याचं कामही सुरु आहे. काही शहरांमध्ये विशाल कोव्हिड हॉस्पिटल उभारले जात आहेत", असं मोदी म्हणाले.

  • 20 Apr 2021 08:50 PM (IST)

    PM Naredra Modi on oxygen : ऑक्सिजनची मागणी वाढली आहे

    कठीण काळात धैर्य सोडू नये. कोणत्याही कठीण काळात योग्य निर्णय घ्यावा, योग्य प्रयत्न करावे, तरच आपण विजय मिळवू शकतो. याच ध्येयाने देश दिवस रात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसात जे निर्णय घेतले, त्यामुळे स्थिती सुधारेल. कोरोना संकटात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

    केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. ऑक्सिजन आवश्यक आहे त्यांना मिळायलाच हवा. राज्यांमध्ये नवे प्लांट सुरु केले जात आहेत, औद्योगिक ऑक्सिजन मेडिकलमध्ये रुपांतरीत, ऑक्सिजन रेल्वे असे प्रत्येक प्रयत्न सुरु आहेत.

    देशातील फार्मा कंपन्यांनी औषधांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलं. ते आणखी वेगवान केलं जात आहे.

  • 20 Apr 2021 08:50 PM (IST)

    सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु : पंतप्रधान

    "आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको, असं म्हटलं आहे. कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत", असं पंतप्रधान म्हणाले.

  • 20 Apr 2021 08:48 PM (IST)

    PM Modi live : संकट मोठं आहे, पण विश्वासाने मात करायची आहे

    संकट मोठं आहे, पण आपल्याला हे संकट विश्वासाने पार करायचं आहे.  सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक या सर्वांनी आपलं आयुष्य पणाला लावून जीव वाचवले. या लाटेतही त्यांनी आपली चिंचा, आपलं कुटुंब सोडून सेवा सुरुच ठेवली आहे.

  • 20 Apr 2021 08:47 PM (IST)

    ज्यांनी माणसं गमावले त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो : पंतप्रधान मोदी

    "कोरोना विरोधात देश आज पुन्हा एक मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती सुधारली होती. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. जे तुम्ही सोसत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या माणसाला गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 20 Apr 2021 08:46 PM (IST)

    PM Modi live - कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली

    कोरोना महामारीत देश मोठी लढाई लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. जो त्रास तुम्ही सहन केला, जो त्रास तुम्ही सहन करत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं, त्यांच्याप्रती देशाकडून संवेदना

  • 20 Apr 2021 08:45 PM (IST)

    देशाच्या परिस्थितीची पंतप्रधान यांनी जबाबदारी घ्यावी : भाई जगताप

    "पंतप्रधान मोदी यांचे आता सगळे दौरे संपले असतील. ते 22 मार्चला जसे आले तसे आज रात्रीपासून सर्व बंद होईल, अशी काहीतरी घोषणा ते करतील. देशाची जी अवस्था झाली त्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. ज्ञान देण्यात ते पटाईत आहेत. उद्योगचक्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे", अशा शब्दात काँग्रेस नेते भाई जगताप यांनी टीका केली.

  • 20 Apr 2021 08:39 PM (IST)

    PM Narendra Modi Live : लसीकरणावर मोदी काय बोलणार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय कालच केंद्र सरकारने घेतला होता. आता हे लसीकरण कसं केलं जाईल, त्याबाबत मोदी बोलतील.

  • 20 Apr 2021 08:38 PM (IST)

    संकट समयी पंतप्रधान जनेतला विश्वासात घेऊन निर्णय घेतील : सुधीर मुनगंटीवार

    "पंतप्रधान नेरेंद्र मोदी नेहमीच जगाशी संवाद साधत असतात. या संकट समयी काही महत्त्वाचे निर्णय मोदीजी जनतेला विश्वासात घेऊन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच लसीकरण, टेस्टिंगबाबत ते कदाचित भाष्य करतील. आपल्याला टेस्टिंग व्यवस्थित केलं पाहिजे. आपण क्वारंटाईनचे नियम पाळले पाहिजेत. या संकटाचा सामना सावधानी, खबरदारी घेत कशापद्धतीने करायचा याबबात सांगतील. तसेत 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाबाबत बोलू शकतात. तसेच काही राज्यांना लॉकडाऊनमध्ये सूट देऊ शकतात", अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    'लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय'

    "आरोग्य व्यवस्थेची अडचण निर्माण झाली आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत आपल्याजवळ एक शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे लॉकडाऊन, ज्याच्यामुळे आपल्याला संसर्ग रोखता येईल. सरकारने गरिबांचा विचार करावाच. यासाठी काहीतरी आर्थिक पॅकेज जाहीर करावा", असंही मुनगंटीवार म्हणाले.

  • 20 Apr 2021 08:37 PM (IST)

    PM Modi Live : थोड्याच वेळात पंतप्रधान लाईव्ह

    पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लाईव्ह, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

Published On - Apr 20,2021 9:11 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.