AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोली जिल्ह्यात मका मिरचीचं पीक पुर्णपणे उद्धवस्त, वीज पडून एका विद्यार्थींचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागत मोठ्या प्रमाणात मिरचीच्या उत्पादन शेतकरी घेत असतात. दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस व गारपीट पडल्यामुळे शेतात ठेवलेली मिरचीचे खूप नुकसान झाले

गडचिरोली जिल्ह्यात मका मिरचीचं पीक पुर्णपणे उद्धवस्त, वीज पडून एका विद्यार्थींचा मृत्यू
farmer gadchiroliImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 21, 2023 | 2:07 PM
Share

मोहम्मद इरफान, गडचिरोली : अवकाळी पाऊस (unseasonal rain) व गारपिटामुळे शेकडो शेतकऱ्यांचे (farmer gadchiroli) मका कारली पिकाचे (crop demaged) मोठे नुकसान झाले आहे.आरमोरी तालुक्यातील सालमारा शंकर नगर ठाणेगाव पाथर गोटा चामोर्शी माल या परिसरात काल ही अवकाळी पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी मक्याची पीक घेत असतात. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे मका पिकाचे खूप मोठे नुकसान यावेळी शेतकऱ्यांचे झाले. गडचिरोली जिल्ह्यातील या आरमोरी भागात सर्वात जास्त गारपीट झाल्याची नोंद ही यावेळी झाली. देसाईगंज आरमोरी या तालुक्यात मक्का शेतीतून शेतकरी चांगला उत्पादन गडचिरोली जिल्ह्यात घेत असतात. अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानं मोठ्या प्रमाणात झाले

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागत मोठ्या प्रमाणात मिरचीच्या उत्पादन शेतकरी घेत असतात. दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस व गारपीट पडल्यामुळे शेतात ठेवलेली मिरचीचे खूप नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 238.5 हेक्टर जमिनीचे गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक विभागाचे कर्मचारी जुनी पेन्शनच्या आंदोलन असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आघाप सर्वे किंवा पंचनामे सुरुवात झाले नाहीत.

गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस सुरू असून आज देसाईगंज तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच ढग दाटून असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त होत होता. दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पहिल्यांदाच संततधार पाऊस पडत आहे. उन्हाळ्याचा प्रारंभ होत असताना अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या भागातील धान, मक्का, टरबूज, डांगरू आणि भाजीपाले पिकांना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. आणखी चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने संकटात भर पडण्याची शक्यता आहे.

राज्यात अवकाळी पावसाच संकट सर्वदूर जाणवत आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापुर्वी वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चामोर्शी तालुक्यातील मालेर चक येथील स्वीटी सोमनकर ही नववीतील विद्यार्थिनी शाळा आटोपून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. विद्यार्थिनीला थांबण्यासाठी जागा नसल्याने ती पुढे जात राहिली. मात्र अचानक तिच्यावर वीज कोसळली. त्यावेळी ग्रामस्थांनी तातडीने तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात 24 तासापासून कमी अधिक प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.