Mango : हंगामाची सुरवात अन् शेवटही पावसाच्या धास्तीतच, नैसर्गिक संकटातच पार पडला हंगाम

Mango : हंगामाची सुरवात अन् शेवटही पावसाच्या धास्तीतच, नैसर्गिक संकटातच पार पडला हंगाम
आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आसून आता आंबा काढणीची लगबग सुरु आहे.
Image Credit source: TV9 Marathi

यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याची चाहूलही गेल्या काही दिवसांपासून लागली आहे. केरळात तर सलग 5 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून तोडणी कामांची लगबग दिसून येत आहे.

महेश सावंत

| Edited By: राजेंद्र खराडे

May 16, 2022 | 12:41 PM

सिंधुदुर्ग :आंबा हंगामाच्या सुरवातीला (Unseasonable Rain) अवकाळी पावसाचा धोका होता तर आता हंगाम अंतिम टप्प्यात मान्सूनपूर्व (Rain) पावसाचे सावट निर्माण झाले आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका (Mango Production) आंबा उत्पादकांना बसलेला आहे .कधी आवकाळी पाऊस तर कधी वाढते ऊन यामुळे थेट उत्पादनावरच परिणाम झाला आहे. आता शेवटच्या टप्प्यातील हापूस काढणीची लगबग सुरु असतानाच पुन्हा पावसाचे संकट ओढवणार आहे. कारण यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होत आहे. ही बाब शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरी आंबा उत्पादकांची चिंता वाढलीय. 2 दिवस केरळात मुसळधार पावसाने पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आंबा काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरुय.

सलग 5 दिवस मान्सूनपूर्व पाऊस

यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याची चाहूलही गेल्या काही दिवसांपासून लागली आहे. केरळात तर सलग 5 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून तोडणी कामांची लगबग दिसून येत आहे. आगोदरच उत्पादनात घट झाली आहे आता आहे तो आंबा पदरी पाडून घेण्याचे प्रय़त्न आंबा उत्पादक शेतकरी करीत आहे.

हापूस शेवटच्या टप्प्यात

अनेक संकटाची मालिका पार करीत अखेर आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उत्पादनात घट झाली असतानाही आंब्याला अपेक्षित मागणीच राहिली नाही. त्यामुळे अधिकचे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रय़त्नांची पराकष्टा केली. हंगाम मध्यावर असताना निर्यातीमुळे काही प्रमाणात उत्पन्नात वाढ झाली होती. त्याचाच आधार आंबा उत्पादकांना मिळालेला आहे. आता अंतिम टप्प्यात आहे ते पीक पदरात पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.

दोन दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन

यंदा सर्वकाही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार होत आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचे ‘स्कायमेट’संस्थेने सांगितले होते. त्यानुसार आता दोन दिवस मान्सूनपूर्व पाऊस तो ही 5 दिवस होणार आहे. आता तळकोकणात काही प्रमाणात आंबा काढणीला आलेला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका बसण्यापूर्वीच आंबा काढणीला सुरवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें