मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

मोहरी पिकासाठी पोषक वातावरण तर आहेच शिवाय मोहरीच्या दरामध्ये सरकारने 400 रुपयांची वाढ केलेली आहे. त्यामुळे तंत्रशुध्द पध्दतीने लागवड आणि जोपासना केली तर यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 4:34 PM

मुंबई : मोहरीचे उत्पादन मराठवाड्यात कमी प्रमाणात घेतले जात असले तरी यंदा मोहरीची लागवड ही फायद्याची ठरणार आहे. कारण मोहरी पिकासाठी पोषक वातावरण तर आहेच शिवाय मोहरीच्या दरामध्ये सरकारने 400 रुपयांची वाढ केलेली आहे. त्यामुळे तंत्रशुध्द पध्दतीने लागवड आणि जोपासना केली तर यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सरकारकारच्या निर्णयानंतर मोहरीचे दर हे 5050 वर पोहचले आहेत. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमधून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांकडे मोहरी लागवडीचा उत्तम पर्याय आहे. मोहरी पेरणीचा हाच योग्य मोसम आहे. त्यामुळे लागवडीपासून काढणी पर्यंत घ्यावयाची काळजी याची माहिती आपण घेणार आहोत..

हेक्टरी 20 क्विंटलचे उत्पादन

मोहरी उत्पादनातून भरघोस उत्पादन घ्यावयाचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. कारण ऑक्टोंबर महिन्यातच मोहरीची लागवड ही केली जाते. लागवडीपूर्वी पुर्वमशागत ही महत्वाची आहे. पुसा मोहरी ही पेरणी केल्यापासून अवघ्या 105-110 दिवसांमध्ये काढणी योग्य होते. योग्य प्रकारे या पिकाची देखभाल केली तर हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पन्न मिळते. शेतीत शेतकऱ्यांनी वैज्ञानिक तंत्राचा वापर केल्यास उत्पन्न नक्कीच जास्त मिळणार आहे. रोगराई आणि किटकांपासून बचाव करणे हाच यामधला महत्वाचा घटक आहे.

आता मोहरी पेरण्याची वेळ आली आहे

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोहरीची पेरणी ही केली जाते. यंदा पेरणीसाठी पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घेणे आवश्यक आहे. 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबरच्या दरम्यान पेरणी झाली तर उत्पादनही अधिकचे मिळणार आहे. एक एकर क्षेत्रात 1 किलो बियाणे पेरायचे आहे. पेरणीच्या वेळी शेतात 100 किलो सुपरफॉस्फेट, 35 किलो युरिया आणि 25 किलो मेरार्ट पोटॅशचा (एमओपी) वापरा करायचा आहे.

अशी घ्या काळजी

पेरणीनंतर 1-3 दिवसांच्या आत तण टाळण्यासाठी पाँडिमेथालिन (30 ईसी) रसायन हे 400 लिटर पाण्यात मिसळून फवारणे गरजेचे आहे. पेरणीच्या दरम्यान दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची आवश्यकता आहे. दोन्ही बियांमधील अंतर हे 20 ते 30 सेंटीमिटर असणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकाची वाढ जोमात होते शिवाय उत्पादनही वाढते.

योग्य पाण्याचे नियोजन

पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी पाणी देण्याचे नियोजन करावे. पिक फुलोऱ्यात असताना पाणी देऊ अन्यथा फुल गळती होऊन पिकाचे नुकसान होण्याचा धोका असतो. छाटणीनंतर पहिल्यावेळी पाणी दिल्यास एकरी 35 किलोप्रमाणे युरियाची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.

रोगराईचे व्यवस्थापन

पेरणीनंतर 65-70 दिवसांनी 250 ग्रॅम कार्बेंडाझीम (12%) आणि मॅन्कोजेब (63%) 200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा. फुलांच्या आणि शेंगा लागवडीच्या वेळी 200 लिटर पाण्यात 250 ग्रॅम थ्युरिया मिसळून फवारणी फायदेशीर ठरणारी आहे. जेव्हा पीक बहरात म्हणजे 75 टक्के शेंगा भरल्यावर त्या पिवळ्या होतात तेव्हाच पिकाची कापणी करा.

जानेवारीमध्ये मोहरीची काढणी

मोहरी हे पीक 105 ते 110 दिवसांचे पीक आहे. योग्य जोपासणी केल्यास या काळात ते काढणीला येते. हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पन्न मिळते. १५ सप्टेंबरच्या सुमारास पेरले होणाऱ्या या पिकाची काढणी ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाऊ शकते. (Mustard price hiked by 400, farmers produce heavily if planted)

संबंधित बातम्या :

शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली

दुष्काळात तेरावा : हमीभाव केंद्रच सुरु नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

शेतकऱ्यांनो कागदपत्रांची पुर्तता करा अन् ‘पी.एम. किसान सन्मान’ योजनेचा निधी मिळवा, अन्यथा…

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.