AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाम’चे काम : नांदेडमधील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, जिल्हा प्रशासनही राबवणार आत्मसन्मान योजना

'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या शेतकरी आत्महत्या पाहता जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.तर वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे.

'नाम'चे काम : नांदेडमधील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, जिल्हा प्रशासनही राबवणार आत्मसन्मान योजना
'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 3:55 PM
Share

नांदेड : (NAM Foundation) ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: (Marathwada) मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या (Farmer Suicide) शेतकरी आत्महत्या पाहता जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.तर वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. यंदाही नांदेड जिल्ह्यातील तब्बल 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर किमान लहान-मोठा व्यवसाय किंवा कठीण प्रसंगी त्यांना या रकमेचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा मदतीचा हात देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या रकमेचे चेक देण्यात आले आहे.

मदतीमुळे संसारात हातभार

घरचा कर्ता पुरुष गेल्यावर अनंत संकटाला सामोरे जावे लागते. शिवाय सध्या हाताला काम नाही आणि वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून थेट आर्थिक स्वरुपात मदत मिळत असल्याने एखादा व्यवसाय सुरु करता येणार आहे. गावस्तरावर शिलाई मशीन, पीठाची गिरणी यामाध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा उपयोग होईल असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले आहे.

आत्मसन्मानासाठी उपक्रम

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या मदतीचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तर लाभ होणारच आहे पण जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही आता आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा आत्मसन्मान करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये बचतगटाच्या माध्यमातून शिलाई मशीन, पिठाची गिरणी देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. मध्यंतरी कोरोनामुळे या उपक्रमाला अडसर निर्माण झाला होता. पण आता पुन्हा उपक्रमाला सुरवात केली जाणार आहे. गेल्या तीन-चार वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले आहे.

नांदेडातील 121 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 121 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून नामच्या वतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. असे असूनही जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी त्याच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी अशाप्रकारे मदतीचा हात पुढे केला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील 121 शेतकरी कुटुंबियांना मदत केली जाणार असून बुधावारपासून रकमेच्या वाटपाला सुरवातही झाल्याचे नाम फाउंडेशन केशव घोणसे पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.