‘शुगर फ्री पेरु’ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

नांदेडच्या शेतकऱ्यांचा कल शुगर फ्री पेरुच्या शेतीकडे वळला आहे. विशेष म्हणजे या पेरुच्या शेतीतून येथील शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होत आहे.

'शुगर फ्री पेरु'ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदा
नांदेडमध्ये शुगर फ्री पेरुच्या शेतीतून लाखोंचा फायदा मिळत आहे.
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 2:54 PM

नांदेड : मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड हिंगोली यासारखे जिल्हे दुष्काळामुळे कायम त्रस्त असतात. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. पाणी मुबलक प्रमाणात नसल्यामुळे या शेतकऱ्यांना नेहमीच अनेक संकटांना सामोरे जावे लागते. मात्र, नांदेड तालुक्यातील मुखेड, देगलूर, बिलोली तालुक्यातील शेतकरी याला उपवाद ठरत आहेत. येथील शेतकऱ्यांचा कल शुगर फ्री पेरुच्या शेतीकडे वळला आहे. विशेष म्हणजे या पेरुच्या शेतीतून येथील शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होत आहे. (Nanded farmer farming sugar free Guava getting lakhs of profit know detail information)

शुगर फ्री पेरुतून एकरी दोन लाखांचा नफा

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि बिलोली तालुक्यात पेरूच्या बागांत मोठी वाढ झाली आहे. शुगर फ्री असणाऱ्या व्हीएनआर या पेरुच्या जातीची या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. सध्या सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर व्हीएनआर या जातीच्या पेरूची लागवड झाली आहे. पेरूच्या या बागांचा सांभाळ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या यंत्रणेची गरज नसल्यामुळे याकडे शेतकऱी आकर्षीत होत आहेत. या पेरुच्या बागेतून सर्व खर्च काढून वर्षाला एकरी दोन लाख रुपयांचा नफा येथील शेतकऱ्यांना मिळतोय.

प्रकाश पाटील या शेतकऱ्याच्या ज्ञानाचा फायदा

एकरी दोन लाखांचा फायदा होत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा पेरुची शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यातही रामपूर येथील प्रकाश पाटील यांच्या ज्ञानाचा फायदा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकाश पाटील यांचे शेतीशी निगडीत शिक्षणामध्ये पीएचडीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीचे कच्चे-पक्के दुवे माहिती आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली तालुक्यात शुगर फ्री पेरूची शेती केली जातेय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातील शेतकरी पेरुच्या शेतीतून लाखोंचा फायदा मिळवत आहेत.

पेरूच्या शेतीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा

शुगर फ्री पेरुच्या शेतीविषयी शेतकरी प्रकाश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शुगर फ्री पेरुची प्रत्यक्ष लागवड करण्याआधी त्यांनी सर्व तांत्रिक गोष्टींचा अभ्यास केला. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन या शेतीतील सर्व बारकावे जाणून घेतले. पाटील यांच्या याच अभ्यासाचा आणि ज्ञानाचा फायदा येथील इतर शेतकऱ्यांना होतोय.

दरम्यान, सध्या नांदेडमध्ये या पेरुच्या शेतीचे प्रमाण बरेच वाढले आहे. एका एकरात दोन लाखांचा विक्रमी नफा मिळत असल्यामुळे नांदेडमधील मुखेड, बिलोली तालुक्यातील शेतकरी आनंदात आहेत. पाण्याची कमतरता असली तरी चांगल्या प्रकारे शेती करता येते याचं उदाहरण हे शेतकरी ठरतायंत.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

पीकविम्याच्या जाचक अटी, अतिवृष्टीने फळबागा उद्ध्वस्त तरीही मदत नाही, शेतकरी हैराण

आधीच कोरोना, लॉकडाऊनची भीती, टोमॅटोला 5 रुपयांचा भाव; उद्विग्न शेतकऱ्याने उचलले मोठे पाऊल

PM-Kisan: केंद्र सरकारद्वारे ‘या’ शेतकऱ्यांकडून 261 कोटींची वसुली, कारण काय?

(Nanded farmer farming sugar free Guava getting lakhs of profit know detail information)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.