तब्बल 15 दिवसानंतर लासलगाव बाजार समिती सुरु, पहिल्याच दिवशी कांद्याला इतका भाव

कांद्याची सर्वात मोठी बाजारसमिती लासलगावमध्ये 15 दिवसानंतर लिलावाला सुरुवात झाली आहे. Onion Auction Lasalgaon APMC

  • उमेश पारीक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव
  • Published On - 13:51 PM, 3 May 2021
तब्बल 15 दिवसानंतर लासलगाव बाजार समिती सुरु, पहिल्याच दिवशी कांद्याला इतका भाव
कांदा

नाशिक: पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बंद होते. लासलगाव बाजार समितीत कांदा आणि धान्य लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना आणि अवकाळी पावसामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बाजारसमितीत दाखल झालेल्या कांद्याला 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. ( Nashik Lasalgaon onion auction started after fifteen days onion price today)

19 एप्रिलपासून लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. यामुळे लासलगाव व परिसरातील गावात कोरोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणात आढळण्यास सुरुवात झाली होती. लासलगाव बाजार समितीतील व्यापारी ,हमाल-मापारी व कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक बाधित होत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लासलगावसह 42 गावातील नागरिकांनी जनता कर्फ्यूची 19 एप्रिल रोजी घोषणा केल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीतील कांदा आणि धान्य लिलाव बंद होते.

निर्बंधांचा सकारात्मक परिणाम

19 एप्रिल पासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं निर्बंध पाळले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधाची मोठी मदत झाली. सोमवारपासून पुन्हा कांदा आणि धान्य लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे

कांद्याला 1500 रुपयांपर्यंत दर

लासलगाव बाजार समितीत 1100 वाहनातून लाल आणि नव्या उन्हाळ 14 हजार 300 क्विंटल कांद्याची आवक लिलावसाठी दाखल झाली. लाल कांद्याला किमान 400 रुपये 1191 कमाल तर सर्वसाधारण 900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाले आहे. तर, उन्हाळ कांद्याला किमान 500 रुपये 1501 कमाल तर सर्वसाधारण 1225 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांनी योग्य प्रतवारी करून कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आलं आहे. सकाळच्या एक सत्रात कांदा व धान्य लिलाव सुरू राहणार असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे सांगितले आहे.

संबंधित बातम्या:

Gold Rate Today: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने-चांदी महागले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो!

( Nashik Lasalgaon onion auction started after fifteen days onion price today)