Success Story : उत्पादनवाढीसाठी तयार केलेले गांडूळ खत आता उत्पन्नवाढीचे साधन, नांदेडच्या शेतकऱ्याच्या अनोखा उपक्रम

Success Story : उत्पादनवाढीसाठी तयार केलेले गांडूळ खत आता उत्पन्नवाढीचे साधन, नांदेडच्या शेतकऱ्याच्या अनोखा उपक्रम
गांडूळ खत निर्मितीमधून नांदेडच्या शेतकऱ्याने हजारो रुरये कमावले आहेत.

गांडूळ खताचा उत्पादनवाढीसाठी उपयोग व्हावा म्हणून उत्तमराव पाटील यांनी त्याची निर्मिती करुन फळबागांना हे खत घातले. खतामुळे फळबागेची वाढ तर जोमात झालीच शिवाय उत्पादन वाढही होऊ लागली. ही किमया गांडूळ खतामुळेच झाल्याने पाटील यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी गांडूळ खत निर्मितीमधून उत्पन्न घेण्याचे ठरविले.

राजीव गिरी

| Edited By: राजेंद्र खराडे

May 20, 2022 | 12:00 PM

नांदेड : (Production) उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग राबवतो. गांडूळ खत हे त्यामधले प्रभावी माध्यम असले तरी अनेक शेतकरी याचा उपयोग करुन घेत नाहीत. मात्र, ज्यांना त्याचे महत्व समजले ते उत्पादन तर वाढवतातच पण त्यालाच आपले उत्पन्नाचे साधन करतात. असाच उपक्रम (Nanded Farmer) नांदेडमधील एका शेतकऱ्याने केला आहे. त्यांनी गांडूळ खतामधून जमिनीची सुपिकता तर वाढवली शिवाय शेळगाव गौरी येथील उत्तमराव पाटील यांनी हेच गांडूळ खत उत्पन्नाचे साधन बनवले आहे. आता त्यांनीच (Vermicompost) गांडूळ खत निर्मितीला सुरवात केली आहे. यामधून पाटील यांचे उत्पन्न वाढले आहे.

फळबागांना फायदा अन् पाटलांचा उत्साह

गांडूळ खताचा उत्पादनवाढीसाठी उपयोग व्हावा म्हणून उत्तमराव पाटील यांनी त्याची निर्मिती करुन फळबागांना हे खत घातले. खतामुळे फळबागेची वाढ तर जोमात झालीच शिवाय उत्पादन वाढही होऊ लागली. ही किमया गांडूळ खतामुळेच झाल्याने पाटील यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी गांडूळ खत निर्मितीमधून उत्पन्न घेण्याचे ठरविले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हा प्रयोग सुरु केला असून शेतकरी आता गांडूळ खताची मागणी करु लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही फरक जाणवत आहे.

गांडूळ खताच्या विक्रीतून वाढले उत्पन्न

ज्या खतामुळे फळबागांचे उत्पादन वाढले जात होते त्याच गांडूळ खताच्या निर्मितीमधून उत्पन वाढवायचे हा निर्धार पाटील यांनी केला होता. आता त्यांनी फळबागाबरोबर गांडूळ खताचेही उत्पादन वाढवले आहे. गांडूळ खताची प्रति टन 6 हजार रुपयांप्रमाणे ते विक्री करीत आहेत. यामधूनही त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. वेगळी वाट निवडली तर कसा दुहेरी फायदा झाला हे पाटील यांच्या या अभिनव उपक्रमातून समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यास दुहेरी फायदा

उत्तमराव पाटील यांनी गांडूळ खताच्या माध्यमातून फळबागा तर जोपासल्याच पण पुन्हा खत निर्मितीचाच अभिनव उपक्रम हाती घेतला. आता शेतकऱ्यांकडून खताची मागणी होत आहे. प्रति टन 6 हजार रुपये याप्रमाणे पैसे देऊन शेतकरी खत घेऊन जात आहेत. उत्तमराव पाटील यांनी हा उपक्रम कुणाच्या मार्गदर्शनेने नाही तर अनुभवावरुन आंमलात आणला आहे. आता लगतचे शेतकरी पाटील यांच्याकडूनच खताची खरेदी करीत आहेत. रासायनिक खतापेक्षा हे खत उत्तमच. यामुळे उत्पादनातही वाढ होते आणि जमिनीचा पोतही सुधारतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें