AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीपातील कांद्याचे किड व्यवस्थापन गरजेचे, अन्यथा ‘कांद्याचा होईल वांदा’

यंदा मात्र, खरीपातील कांदा बाजारात येण्यापुर्वीच संकटात आहे. वातावरणातील बदल आणि मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांद्यावर (Risk of disease) किडीचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे झाले आहे..प्रकारे नुकसान होते.

खरीपातील कांद्याचे किड व्यवस्थापन गरजेचे, अन्यथा 'कांद्याचा होईल वांदा'
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 5:14 PM
Share

मुंबई : कांदा हे प्रमुख नगदी पिक आहे. उन्हाळी आणि खरीपात अशा दोन्ही हंगामात कांद्याची (Onion) लागवड केली जाते. देशातील भाज्यांच्या लागवडीत कांद्याला एक वेगळे महत्व आहे. कांद्याचा वापर कोशिंबीर, मसाले, लोणचे आणि भाज्या तयार करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहवयास मिळतो. त्यामुळे शेतकरी हे रात्रीतून लखपती होतात तर कांद्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. यंदा मात्र, खरीपातील कांदा बाजारात येण्यापुर्वीच संकटात आहे. वातावरणातील बदल आणि मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांद्यावर (Risk of disease) किडीचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे झाले आहे..प्रकारे नुकसान होते.

1) कांद्यावर काळा डाग

खरीप हंगामातील कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काळे डाग हे आजार कोलेस्टेरॉल-कम-ग्लेस्पोराइडियम अच्छादनामुळे होतो. सुरवातीला कांद्याच्या पातेवर राख-रंगाचे पुरळ तयार होतात. नंतर याचे प्रमाण वाढले की पानांवर काळे फुगवटे दिसतात. त्यामुळे पात ही कोमेजून जाते तर पुन्हा वाळतेही.

योग्य नियोजन

१. कांद्याची लागवड करण्यापुर्वी रोपांची मुळे ही कार्बांडाझीम किंवा क्लोरोथ्लोनिलचे 0.2 यामध्ये बुडवून घ्यावीत

2. रोपाची लागवड ही जमिनीपासून उंचीवर करणे गरजेचे आहे.

३. नर्सरीतील बीज ठराविक अंतरावर लावले पाहिजे.

2) थ्रिप्स कीटक

हा एक लहान आकाराचा कीटक आहे. ज्यामुळे कांद्याच्या पातीमधील रस शोषण करुन घेतात. पानांवर पांढरे डाग तयार होतात, जे नंतर पिवळे पांढरे होतात. हा कीटक सुरुवातीच्या अवस्थेत पिवळा असतो जो नंतर काळा तपकिरी होतो.

उपायांवर नियंत्रण 1. कांदा बियाण्यांवर इमिडाक्लोपीड 70 डब्ल्यूएस पावडर (2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे) ची फवारणी करुन बी पेरावे

2. लागवड केल्यानंतर 1 मिली डायमेथोएट 30 ईसी किंवा 1 मिली फॉस्फामाइडन 85 ईसी 0.6% प्रति लिटर मिसळा आणि 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करा.

3) जांभळा डाग (जांभळा ब्लॅच)

कांद्याच्या सर्वच भागावर ही किड आढळून येते. कांद्याची पात, मुळ आणि देठावर या प्रादुर्भाव होतो. रोगग्रस्त भागावर पांढरे तपकिरी डाग तयार होतात, ज्याचा मधला भाग नंतर जांभळा होतो. या आजारामुळे साठवणुकीच्या वेळी कांदा सडतो. त्यामुळे प्रचंड नुकसान होते.

उपायांवर नियंत्रण 1. प्रतिरोधक प्रजातींचे बियाणे कांद्यातील रोग नियंत्रणासाठी वापरले पाहिजेत

2. पेरणीपूर्वी कांदा बियाण्यांवर 2.5 ग्रॅम प्रति किलो दराने थेअरमचे उपचार केले पाहिजेत

3. जेव्हा किडीचा प्रादुर्भाव मुख्य पिकावर होतो तेव्हा 2.5 ग्रॅम क्लोरोथालोनिल 75% प्रति लिटर पाण्यामध्ये, 2.5 ग्रॅम डिथन एम-45 0.01 सॅन्डोव्हिट किंवा कोणत्याही चिकट पदार्थात मिसळणे आवश्यक आहे. 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारणी केली पाहिजे.

4) मऊ वितळण

हा आजार एर्व्हिनिया कॅरोटोवोरा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या आजाराच्या संसर्गामुळे पाने पिवळी होतात आणि वरपासून खालपर्यंत पाने ही कोरडी पडतात. जास्त संसर्ग झाल्यास वनस्पती 1 आठवड्यात कोरडी पडते. या आजारामुळे कांदा बियाण्यांच्या पिकाचे अधिक नुकसान होते.

उपायांवर नियंत्रण 1. निरोगी नर्सरी लावावी

2. कांद्यामध्ये आजाराची लक्षणे दिसल्यावर प्रतिजैविक स्ट्रेप्टोसायक्लिन जलद्रावणाचे 200 पीपीएम फवारणी गरजेची

3. जैव नियंत्रित जीवाणू स्यूडोमोनास फ्लोरिसेन्स हे हेक्टरी 5.0 किलो दराने लागवड करण्यापूर्वी शेतात मिसळले पाहिजेत.

नियंत्रण उपाय

कांदा काढल्यावर तो पूर्णपणे वाळवून कमी आर्द्रता आणि हवेशीर खोलीत साठवणे गरजेचे आहे. (Onion production will be available only if pest management is done, important salla for onion growers)

संबंधित बातम्या :

कोबीची शेती : कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय

लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र ‘जैंसे थे’

सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.