Gondia : दूध का दूध पानी का पानी..! धान खरेदीत अनियमितता, चार विभागांकडून चौकशी सुरु

शेतकऱ्यांच्या मागणीमुळे गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वाढीव मुदत मिळाली. या मुदतीमध्ये 4 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्याची परवानगी नाफेडच्या माध्यमातून मिळाली. मात्र, स्थानिक पातळीवर केवळ 1 तासामध्ये 4 लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी करण्याचा पराक्रम खरेदी केंद्रांनी केला. एवढ्या कमी वेळात ही खरेदी कशी शक्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार याची चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती.

Gondia : दूध का दूध पानी का पानी..! धान खरेदीत अनियमितता, चार विभागांकडून चौकशी सुरु
धान पीकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 3:36 PM

गोंदिया : (Rabi Season) रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र ही खरेदीपेक्षा इतर कारणांनीच गाजली. शेतकऱ्यांकडील (Paddy Crop) धानाची वेळेत खरेदी व्हावी व त्यांना चांगला मोबदला मिळावा म्हणून ही खरेदी केंद्र (NAFED) नाफेडच्या माध्यमातून सुरु केली जातात. विदर्भात धान पीक हे मुख्य आहे. त्यामुळे याची संख्याही वाढली जाते. यंदा मात्र, खरेदी केंद्रांनी कमी कालावधीत अधिकची खरेदी केली. मात्र, ही खरेदी शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा सवाल उपस्थित झाला होता. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांनी केवळ 1 तासामध्ये 4 लाख क्विंटलहून अधिक धानाची खेरदी केल्याचे दाखविले होते. त्यामुळे आता ह्या खरेदी केंद्रांची चौकशी ही मार्केटिंग फेडरेशन, एफसीआय, अन्न व पुरवठा विभाग दिल्ली व जिल्हाधिकारी या चार यंत्रणांनी सुद्धा संपूर्ण धान खरेदीच्या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे धान खरेदीतील घोळ आता कुणाला भोवणार याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

म्हणून चौकशीचे आदेश..

शेतकऱ्यांच्या मागणीमुळे गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वाढीव मुदत मिळाली. या मुदतीमध्ये 4 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्याची परवानगी नाफेडच्या माध्यमातून मिळाली. मात्र, स्थानिक पातळीवर केवळ 1 तासामध्ये 4 लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी करण्याचा पराक्रम खरेदी केंद्रांनी केला. एवढ्या कमी वेळात ही खरेदी कशी शक्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार याची चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे आता चार विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचा वापर केला कुणी असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता चौकशीदरम्यान अनेक बाबी समोर येणार आहेत.

अशी होणार चौकशी

पहिल्या टप्प्यातील चौकशीचा अहवाल सोमवार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यात बराच सावळा गोंधळ पुढे आला. त्यानंतर याप्रकरणाची अधिक खोलात जाऊन चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा एक चौकशी समिती नेमली आहे. यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 10 उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश असून त्यांच्या मदतीला गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा विभागाचा प्रत्येकी एक अधिकारी देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांचे धान थप्पीलाच

शेतकऱ्यांकडील शिल्लक धान खरेदीसाठी नाफेडने मुदतवाढ केली. यासाठी जिल्ह्यातील खरेदी केंद्रांनी आठ दिवसांमध्ये शिल्लक धानाची करावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र, 7 जुलैच्या एकाच दिवशी जिल्हाभरात 4 लाख क्विंटलहून अधिक खरेदी झाल्याचे दाखविण्यात आले होते. एकाच दिवशी शेतकऱ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी होणार कशी असा संशय निर्माण झाला होता. शिवाय शेतकऱ्यांचे धान आणखी थप्पीलाच आहे. त्यामुळे खरेदी झाली पण कुणाची हा सवाल कायम आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.