AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panand Road : पाणंद रस्त्यात खोडा, मग सरकारी योजनांचा लाभ विसरा, राज्य सरकार कडक नियम लावणार, अपडेट तरी काय?

Panand Road : 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. पाणंद रस्त्यात खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना आता धडा शिकवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी काही कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे.

Panand Road : पाणंद रस्त्यात खोडा, मग सरकारी योजनांचा लाभ विसरा, राज्य सरकार कडक नियम लावणार, अपडेट तरी काय?
गावकी नि भावकीचा खोडा नको
| Updated on: Oct 05, 2025 | 10:07 AM
Share

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेत आता कडक नियमांची अंमलबजावणी होणार आहे. काही शेतकरी या योजनेत नाहक आडकाठी आणत असल्याचे आणि खोडा घालत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महसूल खात्याला रस्ते करण्यात अडचणी येत आहेत. गावकी आणि भावकीच्या नादात सरकारी योजनेचा फज्जा उडत असल्याचे समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने मोठे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना धडा शिकवण्यात येणार आहे.

गावकी-भावकीचा खोडा

बळीराजा पाणंद रस्ते योजनेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी आणि गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगूनही हे अतिक्रमण करणारे शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांनी अतिक्रमण काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेत जागोजागी, गावोगावी ब्रेक लागला आहे. ही योजना यावेळी तडीस लावण्याचा आणि गावपातळीवर सुद्धा रस्त्याचे जाळे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याला मोठा ब्रेक लागला आहे.

सरकारी योजना विसरा

जे शेतकरी या योजनेत सहकार्य करणार नाही. अतिक्रमण हटवणार नाहीत. गावकीला आणि भावकीला वेठीस धरण्याचा आणि सरकारी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. त्यांना राज्य सरकार धडा शिकवण्याचा विचार गांभीर्याने करणार आहेत. अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय लवकरच शासन दरबारी होऊ शकतो. इतकेच नाही तर बँकांना अशा अडेलतट्टू शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा न करण्याचा प्रस्ताव पण समोर असल्याचे समजते. त्यामुळे नाहक चांगल्या योजनेत खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

CISR फंडाचा वापर

शेत रस्त्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेसाठी राज्य सरकार सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. योजनेसाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन होणार आहे. या योजनेत राज्यात एकूण 40 हजार किलोमीटर पाणंद रस्त्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहेत. शेतरस्त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होईल. तर शेतापर्यंत पोहचण्यासाठीची शेतकऱ्यांची कसरत थांबेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.