शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली रे…2000 रुपये या दिवशी खात्यावर पडणार? मोठी माहिती समोर!
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी, असे आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. एकूण तीन हप्त्यात हा निधी मिळतो. आता शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 23 व्या हप्य्ताचे 2000 रुपये कधी मिळणार? असे विचारले जात आहे. दरम्यान आता याबाबत मोठी खुशखबर समोर आली आहे.
दरवर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळतो लाभ
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केलेली आहे. या योजनेचा दरवर्षी कोट्यवधी शेतकरी फायदा घेतात. गरीब शेतकऱ्यांना पेरणी, कोळपणी, बी-बियाणे, खत खरेदीसाठी या पैशांची मदत व्हावी, हा उद्देश यामागे आहे. 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या 17 व्या हप्त्याचे पैसे 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जातील अशी घोषणा केली होती. त्यावेळी देशभरात 9 कोटी पेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होता. त्यामुळेच आता या वर्षीदेखील 23 वा हप्ता लवकरच मिळू शकतो, असा तर्क लावला जात आहे.
प्रत्येक वर्षाला दिले जातात 6000 रुपये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक वेळी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या बँका खात्यात हे पैसे टाकले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे मिळतात.
23 वा हप्ता नेमका कधी मिळणार?
दरम्यान, या महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता येत्या 18 जून रोजी मिळू शकतो, असा तर्क लावला जात आहे. 18 जून रोजीच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांना पाठवले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. परंतु याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही. सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली तरच त्यावर विश्वास ठेवावा असे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी
दरम्यान, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी, असे आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच शिक्षणाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांसोबत सायबर क्राईमही घडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे.
