AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ व अनुदानबाबत काय आहेत नियम?

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana; know How do farmers get benefits and what are the rules regarding subsidy)

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ व अनुदानबाबत काय आहेत नियम?
तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) वर संपर्क साधू शकता.
| Updated on: May 12, 2021 | 5:59 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या असून त्यामध्ये शेतीतील उत्पादन वाढण्यापासून ते चांगल्या दर मिळण्यापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान कृषि सिंचन योजना. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच योजनेतून शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत केली जाते. जाणून घेऊया ही योजना काय आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो. तसेच या खास योजनेचा फायदा कोणते शेतकरी घेऊ शकतात आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे शेतकरी बंधू सिंचनासाठी सरकारकडून अनुदान घेऊ शकतात. (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana; know How do farmers get benefits and what are the rules regarding subsidy)

काय आहे ही योजना?

केंद्राने शेतीला पाणी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतात सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे. या योजनेत शासनाच्या वतीने नवीन जलस्रोत तयार करणे, जलसाठा, भूजल विकास आदी कामे केली जातील. तसेच या योजनेत सिंचन उपकरणे व योजनांवर सरकारकडून भरीव अनुदान दिले जात आहे, ज्यात प्रत्येकजण पाणी, खर्च आणि कष्टांची बचत करतो. सरळ शब्दांत सांगायचे तर, आपण नवीन मार्गाने सिंचन केले तर सरकार शेतकऱ्यांना त्याची उपकरणे खरेदी करण्यात मदत करते. या योजनेतून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन इत्यादींना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच प्रत्येक पिकाच्या आधारे सिंचनाचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून केवळ पाण्याची बचत होणार नाही तर उत्पादनही वाढू शकेल. योग्य वेळेत सिंचन न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल?

या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती व पाण्याचे स्त्रोत आहेत अशा शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जे कंत्राटी शेती करीत आहेत आणि सहकारी सदस्य, बचत गटांनाही लाभ देण्यात येत आहे.

कसा मिळेल फायदा?

यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि आधार कार्ड, खतौनी इत्यादींची माहिती द्यावी लागेल. तसेच या योजनेत शासनाकडून 80 ते 90 टक्के अनुदान सिंचन उपकरणावर दिले जाते. (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana; know How do farmers get benefits and what are the rules regarding subsidy)

इतर बातम्या

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने स्वस्त, पटापट वाचा नवे दर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा, गोंदियातील बदलीला स्थगिती

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....