AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला

सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये 'अशी' घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 1:49 PM
Share

लातूर : सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

त्यामुळे उत्पादन वाढीसाठी या हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळबागांची कशी काळजी घ्यावयाची याची आपण माहीती घेऊ.. प्रत्येक वेगळ्या हंगमातील वातावरणाचा परिणाम हा पिकांवर पडत असतो. मात्र, या गोष्टींकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असते. याचा परिणाम भविष्यात उत्पादनावर होतो. त्यामुळे योग्य काळजी घेतली तर उत्पादनातही वाढ होणार आहे आणि जमिननीचे आरोग्यही सुधारणार आहे.

* फळबागेचे रक्षण होईल या दृष्टीकोनातून बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, मलबेरी, व बांबू या सारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.

*बागेभोवती चारी बाजूने दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प अथवा सुरुची दाट लागवड करावी. ह्या बागेत झाडांची सतत निगा राखावी व छाटणी करावी.

*मुख्य फळझाडे जर लहान असतील तर रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पोट पिके घ्यावीत.

*केळी, पपई व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरी लावून सजीव कुंपण तयार करावे.

हे आहेत नियंत्रणाचे उपाय

* थंढीच्या दिवसांमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान हे थोडे जास्त असते. त्यामुले थंडीची पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.

*झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचे खोडालगत आच्छादन करावे, जेणेकरून कमी तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.

*केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये तर मिळतातच परंतु, पेंड कुजतांना त्यापासून उष्णता निर्माण होते आणि बागेतील तापमान सुधारते, याशिवाय सुत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.

*थंडीचे प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.

*रोपवाटीकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे. असे छप्पर सायंकाळी 6 वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचा वापर करावा.

*नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा, तसेच पालाशयुक्त खते किंवा कोळशाची राख खात म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते.

*नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीस प्रतिकारक अशा जाती वापराव्यात. वरील नमूद केलेल्या कमी खर्चिक बाबींचा जर आपण आपल्या फळ बागेमध्ये तापमान नियोजानाकरिता वापर केल्यास आपणास दर्जेदार उत्पादनासह फळबागेचे आयुष्य वाढविण्यास नक्कीच मदत होईल. (Production to increase only if orchards are taken care of during winters, farmer advice)

संबंधित बातम्या :

…म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

राज्यातील 150 साखर कारखान्यांना दिलासा, दिल्लीच्या बैठकीत प्राप्तिकरावर तोडगा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.