कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

चार दिवसांपूर्वी कांद्याचे दर 3 हजाराहून अधिकचा दर मिळालेला होता. मात्र, मंगळावारपासून दरात कमालीची घट होत आहे. त्यामुळे वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता तर ग्राहकांचे नुकसान होत होते पण आता दिवसेंदिवस दर घटत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:50 PM

नाशिक : कांदा हे नगदी पीक आहे. (onion cash crop) कधी ग्राहकांच्या डोळ्यात तर कधी शेतकरी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या पीकाच्या दराबद्दल अनिश्चितता आहे. (Onion prices fall )चार दिवसांपूर्वी कांद्याचे दर 3 हजाराहून अधिकचा दर मिळालेला होता. मात्र, मंगळावारपासून दरात कमालीची घट होत आहे. त्यामुळे वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता तर ग्राहकांचे नुकसान होत होते पण आता दिवसेंदिवस दर घटत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.

कांद्याचे सर्वात मोठा उत्पादक महाराष्ट्रात आहेत. दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घट होत आहे. दरात अशीच घसरण राहिली तर ग्राहकांना लवकरच महागड्या कांद्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. आशियातील सर्वात मोठ्या मंडई असलेल्या लासलगावला मंगळवारी किमान 85 रुपये तर जास्तीत जास्त 3231 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर हे 2750 रुपये प्रति क्विंटल होती. व्यापाऱ्यांनी छापा टाकलेल्या आयकर विभागाच्या छाप्यांमुळे हे घडले असल्याचे सांगितले जाते. कारणे काहीही असोत, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

किरकोळ बाजारात मात्र दरवाढ

मंगळवारी पिंपळगाव मार्केटमधील कांद्याचा किमान भाव 1500 रुपये, कमाल 3581 आणि सर्वसाधारण दर 2851 रुपये प्रति क्विंटल होता. त्याचप्रमाणे विंचूरमध्ये किमान दर 1000 रुपये, कमाल 3201 रुपये आणि सर्वसाधारण दर 2750 रुपये होता. तर निफाडमध्ये कांद्याचे सर्वसाधारण दर 2750 रुपये प्रति क्विंटल होता. तर किमान किंमत 1100 रुपये होती तर कमाल दर हे 3060 रुपये प्रति क्विंटल होती. देशाच्या एकूण कांदा उत्पादनाच्या सुमारे 40 टक्के वाटा महाराष्ट्रात आहे.

आवक वाढल्याने दर घसरले

कोणत्याही शेतीमालाची आवक वाढली की, दर घसरतात हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. त्यामुळे मध्यंतरी दर वाढल्याने केवळ राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही कांद्याची आवक वाढलेली आहे. आवक वाढल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देखील दर घसरले असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत डिगोले यांनी सांगितले आहे. शिवाय ही घसरण काय कायम राहणार नाही. जुना कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये पुन्हा दर वाढणार आहेत.

पावसामुळे कांद्याचे नुकसानही

एप्रिल-मे मध्ये साठवलेले कांदे पाऊस आणि पुरामुळे सडले आहेत. यावर्षी मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर आदी ठिकाणी ठेवलेल्या कांद्याला ओला झाल्याने सडलेला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगावमध्येही अनेक शेतकऱ्यांचे कांदे सडले आहेत. ज्यामुळे काही दिवसांत किंमत वाढेल. शेतकरी संघटना 30 रुपये किलो भावाची मागणी करत आहेत.

लासलगावमध्ये कांद्याच्या किमंती

25 ऑगस्ट रोजी किमान दर 600, सर्वसाधरण किंमत 1551 होती तर कमाल दर 1781 रुपये प्रति क्विंटल होती. 3 सप्टेंबर, किमान दर 500, सर्वसाधारण किंमत 1540 रुपये आणि कमाल 676 रुपये प्रति क्विंटल होती. 2 ऑक्टोबर रोजी किमान किंमत 1000 रुपये, सर्वसाधारण किंमत 2970 रुपये आणि कमाल 3101 रुपये प्रति क्विंटल होती. १८ ऑक्टोबर रोजी किमान किंमत 900 रुपये, सर्वसाधारण किंमत 3100 रुपये आणि कमाल किंमत 3639 रुपये प्रति क्विंटल होती. 26 ऑक्टोबर रोजी किमान दर 851 रुपये, सर्वसाधारण किंमत 2750 रुपये आणि कमाल किंमत 3231 रुपये प्रति क्विंटल होती.

संबंधित बातम्या :

राज्यातील 150 साखर कारखान्यांना दिलासा, दिल्लीच्या बैठकीत प्राप्तिकरावर तोडगा

50% अनुदानावर करा शेळीपालन, पहिल्या टप्प्यात कोणत्या तीन जिल्ह्यांना मिळणार लाभ ?

राज्यानंतर केंद्राचीही नुकसानभरपाई, कशी होते रक्कम खात्यामध्ये जमा ?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.